रेल्वे मंत्रालय

2021 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी ‘मोठ्या परिवर्तनाचे वर्ष’ ठरले आहे


वर्ष 2021 मध्ये पायाभूत सुविधांचा विकास, अभिनवता , नेटवर्क क्षमता विस्तार, मालवाहतुकीचे वैविध्य यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली.

रेल्वेद्वारे मालवाहतुकीचे राष्ट्रीय आर्थिक पुनरुत्थानात योगदान

कोविड आव्हानावर केली मात : रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे राज्यांना ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित केला

किसान रेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे

रेल्वेने एक नवीन पर्यटन योजना म्हणजेच संकल्पना आधारित पर्यटन सर्किट रेल्वेगाड्या ‘भारत गौरव’ सुरु केल्या आहेत.

तेजस राजधानी रेल्वेगाड्या 4 मार्गांवर सुरू करण्यात आल्या

Posted On: 01 JAN 2022 5:51PM by PIB Mumbai

1.वाढीव सुरक्षा

  • एप्रिल 2019 पासून शून्य प्रवासी मृत्यू
  • समान कालावधीत (30.12.2021 पर्यंत) 2020-21 मधील 14 आणि 2019-20 मधील 48 अपघातांच्या तुलनेत एकूण 22 अपघात.

2. मालवाहतूक

  • 2021-22 या कालावधीत 31.12.2021 पर्यंत 1029.94 मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली , 2020-21 मधील 31.12. 2020 पर्यंतच्या 870.41 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत (+159.53 MT) +18%.
  • वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांत सर्वाधिक लोडिंग (सप्टेंबर'20 ते डिसेंबर'21 कालावधीतील संबंधित महिन्यात सलग 16 महिने)

3.1768 पैकी 1646 मेल/एक्स्प्रेस गाड्या (93%), 5626 पैकी 5528 उप-नगरी (98%) आणि पॅसेंजर- 3634 पैकी 1599 (44%) गाड्या धावत आहेत.

  • सध्या, आरक्षित प्रवाशांचे बुकिंग 2019-20 पेक्षा जास्त आहे

4. 2021-22 दरम्यान (31.12.2021 पर्यंत) मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा 92.55% आहे.

5. मालगाडीचा वेग:

  • 2020-21 मधील (31.12.2021 पर्यंत) ताशी 42.97 किमीच्या तुलनेत 2021-22 मध्ये मालवाहतूक गाडीचा सरासरी वेग ताशी 44.36 किमी आहे (+3.23 %).

6.पायाभूत सुविधांची प्रगती

  • आर्थिक वर्ष 21-22 मध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2.15 लाख कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक भांडवली तरतूद करण्यात आली आहे. नोव्हेंबर 21 पर्यंतचा खर्च 1,04,238 कोटी रुपये (48.5%) आहे.
  • रेल्वे विद्युतीकरण प्रगती: 30.12.2021 पर्यंत 1924 किमी मार्गाचे विद्युतीकरण, मागील वर्षी याच कालावधीत ते 1903 किमी मार्ग इतके होते.
  • नवीन मार्ग / दुहेरीकरण/ गेज रूपांतरण: 30.12.2021 पर्यंत 1330.41 किमी (NL: 120.5 किमी GC: 242.3 किमी, DL: 967.61 किमी)
  • नोव्‍हेंबर 21 पर्यंत 83 आरओबी आणि 338 आरयूबी
  • नोव्हेंबर 21 पर्यंत 172 एफओबी, 48 लिफ्ट आणि 50 एस्केलेटर सुरू करण्यात आले

7. गती शक्ती कार्गो टर्मिनल धोरण: भारतीय रेल्वेचा मालवाहतुकीचा हिस्सा वाढवण्यासाठी जलद गतीने मंजुरी आणि कार्गो टर्मिनल्सची स्थापना सुलभ करण्यासाठी सुरु केले

8. किसान रेल

  • देवळाली (महाराष्ट्र) आणि दानापूर (बिहार) दरम्यान पहिल्या किसान रेल्वे सेवेला 7 ऑगस्ट 2021 रोजी रेल्वे मंत्री आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
  • 100व्या किसान रेलला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला
  • 1806 किसान रेल गाड्या 153 मार्गांवर धावत असून (24.12.2021 पर्यंत) सुमारे 5.9 लाख टन कृषी उत्पादनांची वाहतूक केली

9. 840 स्थानकांवर (वर्षभरात 47) सीसीटीव्ही बसवण्यात आले

10. एकूण 6089 स्थानकांवर (वर्षभरात 120) वाय-फाय सुरू करण्यात आले

11. भारतीय रेल्वेत 4G आधारित लाँग टर्म इव्होल्यूशन (LTE) सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्झ मधील 5 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम सुरक्षितता आणि सुरक्षा वापरांसाठी वितरित करण्यात आले .

12. मालवाहतूक आणि प्रवासी व्यवसाय विभागाशी संबंधित वापरण्यास सुलभ अशी नवीन संकेतस्थळे सुरू झाली .

13. ऑनलाइन आणि एकत्रित व्हेंडर मंजुरी प्रणालीसाठी, युनिफाइड व्हेंडर अप्रूव्हल मॉड्यूल (UVAM) देखील सुरू करण्यात आले आहे. मंजुरीसाठी अंतर्गत प्रक्रिया सुलभ आणि वेगवान केल्या आहेत. .

14. आरडीएसओ (RDSO) ही भारतातील पहिली मानक विकास संस्था (SDO) बनली आहे , जिला 24 मे 2021 रोजी BIS SDO मान्यता योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली.

15. वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या, नवीन सुविधा निर्माण केल्या आहेत आणि रेल्वे रुग्णालयांमधील विद्यमान सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

  • 78 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र बसवण्यात आले असून ते रेल्वे रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. आणखी 17 ऑक्सिजन संयंत्र मंजूर करण्यात आले आहेत आणि ते कार्यान्वित होण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.
  • 69 रेल्वे रुग्णालये कोविड-19 संसर्ग बाधित रेल्वे कर्मचाऱ्यांना उपचार देत आहेत. या रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांसाठी खाटांची संख्या 2539 वरून 3948 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • एकूण कोविड बेड 6972,आयसीयू बेड 273 वरून 404, इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर 62 वरून 3544, अतिरिक्त 449 नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेटर आणि 129 हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन्स वाढवण्यात आली आहेत. तसेच 3420 ऑक्सिजन सिलिंडर्स रेल्वे रुग्णालयांना पुरवण्यात आली आहेत.

16. भारतीय रेल्वेत रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS )

  • गेल्या एका वर्षात भारतीय रेल्वेच्या 572 रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली -HMIS उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि उर्वरित ठिकाणी मार्च'22 पर्यंत पुरवली जाईल.
  • रेल्वेने बहुतांश कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशिष्ट वैद्यकीय ओळखपत्र (UMID ) प्रदान केले आहे. आतापर्यंत 42.09 लाख ओळखपत्रे रेल्वेच्या वैद्यकीय लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. विशिष्ट वैद्यकीय ओळखपत्र आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्राशी देखील जोडले आहे.

17. भारतीय रेल्वेने अल्पावधीत ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवून ऑक्सिजन पुरवठा वाढवला.

  • टँकरचा पुरवठा करणाऱ्या राज्य सरकारांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
  • रेल्वे लगतच्या जवळपास सर्वच भागात इच्छित मार्ग आणि रेक तयार करण्यात आले होते.
  • आत्तापर्यंत 899 हून अधिक ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे आणि 15 राज्यांना 36,840 टनांहून अधिक द्रवरूप ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे.
  • ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे बांगलादेशलाही ऑक्सिजन (3911.41 MT) पुरवण्यात आला .

18. 4,176 डब्यांचे विलगीकरण/अलगीकरण सुविधा म्हणून रूपांतर करण्यात आले : देशभरात कोविड-19 साठी विलगीकरण/अलगीकरण सुविधा म्हणून 4,176 रेल्वे डब्यांपैकी 324 डबे राज्य सरकारच्या मागणीनुसार दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. .

19. 30.12.2021 पर्यंत सुमारे 10.97 लाख कर्मचार्‍यांना पहिली मात्रा आणि 8.38 लाख कर्मचार्‍यांना दोन्ही मात्रा देऊन लसीकरण करण्यात आले.भारतीय रेल्वेची 135 लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत

20. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि गुवाहाटी येथील 5 विभागीय रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा सुरू करण्यात आली आहे.

21. तेजस राजधानी रेल्वेगाडी : 4 राजधानी एक्स्प्रेस आनंदविहार- आगरतळा, मुंबई- नवी दिल्ली (2) आणि राजेंद्र नगर टर्मिनल (पाटणा) - नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस तेजस रेकसह धावत आहेत.

22. उच्च क्षमतेचे 3 टिअर वातानुकूलित इकॉनॉमी कोच (LWACCNE):भारतीय रेल्वेने 10.02.2021 रोजी उच्च क्षमतेचे 3 टिअर वातानुकूलित इकॉनॉमी कोच हा नवीन प्रकार समाविष्ट केला आहे आणि गेल्या दोन महिन्यांत 33 कोचचे उत्पादन केले आहे. यामुळे रेल्वेमध्ये एकूण 54 AC-III टियर इकॉनॉमी कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी या कोचच्या संरचनेत अनेक नवकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक स्विचगियर भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच अंडर फ्रेमच्या खाली हलवण्यात आले आहे, ज्यामुळे 11 अतिरिक्त बर्थ बसवून प्रवासी क्षमता 72 वरून 83 बर्थपर्यंत वाढवली आहे.

23. भारत गौरव- संकल्पना आधारित रेल्वेगाड्या : भारताच्या विशाल पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी, भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव’ ही संकल्पना आधारित टुरिस्ट सर्किट ट्रेन्स ही एक नवीन पर्यटन योजना सुरू केली आहे.

  • देशाच्या कानाकोपऱ्यातील सेवा प्रदाते देशाच्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वैभवशाली खजिन्याचे दर्शन घडवू शकतील.
  • सेवा प्रदाते कोचचे नूतनीकरण करू शकतील आणि त्यांना संकल्पना, प्रवास भाडे , अंतर्गत सजावट आणि इतर व्यवसाय पद्धती ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

24. गांधीनगर कॅपिटल (WR) आणि राणी कमलापती (WCR) स्थानकांचा पुनर्विकास: गांधीनगर कॅपिटल स्थानक हे 16.07.2021 रोजी सुरू केलेले पहिले पुनर्विकसित स्थानक आहे. राणी कमलापती हे दुसरे पुनर्विकसित स्थानक आहे आणि ते 15.11.2021 रोजी सुरू करण्यात आले. दोन्ही स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

25. एन्ड ऑफ ट्रेन टेलीमेट्री (EoTT): पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये एन्ड ऑफ ट्रेन टेलीमेट्री (EoTT) साठी संकल्पना चाचण्या घेतल्या जात आहेत. ईसीओआरमध्ये 3 संचांची चाचणी सुरु असून 740 संचांची दुसऱ्या टप्प्यातील खरेदी सुरू आहे.

26. रोलिंग स्टॉक उत्पादन (नोव्हेंबर'21 पर्यंत):

  • इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह: मागील वर्षांच्या 414 च्या तुलनेत 570 (लक्ष्य: 981)
  • एलएचबी कोचेस : गेल्या वर्षीच्या 2788 च्या तुलनेत 3790 (लक्ष्य: 6497)
  • व्हिस्टा डोम कोचेस : उत्पादित: 13 (नोव्हेंबर'21 पर्यंत) (लक्ष्य: 90). एकूण उपलब्ध: 57

***

MaheshC/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786919) Visitor Counter : 331