विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विज्ञानविषयाला वाहिलेल्या मासिकाच्या हिंदी, उर्दू आणि इंग्रजी आवृत्तींचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते प्रकाशन


उर्दू मासिकाचे नाव आहे तेजास्सुस तर हिंदी आणि इंग्रजी आवृत्तींची संकल्पना आहे “ड्रीम 2047”

Posted On: 29 DEC 2021 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2021

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेंद्र सिंग यांनी आज हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतील विज्ञान विषयाला वाहिलेल्या  मासिकाचे औपचारिक प्रकाशन केले. यावेळी इतर प्रादेशिक भाषांसोबातच या मासिकाच्या डोग्री आणि काश्मिरी आवृत्तीदेखील लवकरच प्रकाशित करण्यात येतील अशी घोषणा केली.

भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वर्षाच्या अनुषंगाने हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीची ‘ड्रीम 2047’ ही संकल्पना ठरविण्यात आली आहे, तर उर्दू आवृत्तीचे नाव ‘तेजस्सुस’ (उत्सुकता) ठेवण्यात आले आहे. ही आवृत्ती काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठाच्या सहकार्याने तयार करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच प्रादेशिक भाषांमध्ये विज्ञानविषयक साहित्याचा प्रसार –प्रचार करण्यास प्राधान्य दिले आहे. यातून लोकांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये  ‘विज्ञानाविषयी प्रेम’ निर्माण करता येईल असा विचार आहे. भाषा ही विषय शिकण्यातील अडथळा नको तर ती सुविधा असावी, यावर त्यांनी भर दिला.

भारतीय भाषांमध्ये वैज्ञानिक संवाद आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हे आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. तसेच, प्रादेशिक भाषांमध्ये विज्ञानविषयक पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी, आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. यावर अध्ययन करणाऱ्या एका समूहाला ही जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विज्ञानविषयक साहित्य सर्वसामान्य लोकांसाठी उर्दू भाषेत उपलब्ध करुन देण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठाने घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतूक केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ एस चंद्रशेखर, सीएसआयआर चे महासंचालक डॉ शेखर मांडे, काश्मीरच्या केंद्रीय विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. फारूख अहमद शाह,  विज्ञान प्रसारचे संचालक डॉ नकुल पराशर, यावेळी उपस्थित होते.


* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786095) Visitor Counter : 255