उपराष्ट्रपती कार्यालय

चांगल्या शासन‌ कारभारासाठी चांगल्या विधिमंडळांची आवश्यकता', उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन


वारंवार येणाऱ्या व्यत्ययामुळे विधीमंडळांतील कारभाराकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता


सुशासन दिनानिमित्त माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांना श्री.नायडू यांनी वाहिली आदरांजली

Posted On: 25 DEC 2021 10:54AM by PIB Mumbai

'चांगल्या शासन‌कारभारासाठी चांगल्या विधिमंडळांची आवश्यकता असून त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींवर लोकांची जबाबदारी रहाते, यावर उपराष्ट्रपतींनी आज  भर दिला आहे. सदनातील विविध आयुधे उदाहरणार्थ प्रश्नोत्तराचा तास, अल्प कालावधीच्या चर्चा, विधेयकावरील वादविवाद इत्यादींचा वापर   करत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सरकारला विविध धोरणांची  अंमलबजावणी, विविध कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल  प्रश्न विचारायला हवेत, असे  त्यांनी नमूद केले. त्यासाठी 'चांगले विधिमंडळ सदस्य', जे लोकांनी  त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाला  न्याय देऊ शकतील ,त्यांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  सतत व्यत्यय आणि वारंवार स्थगिती होत असल्याने  विधिमंडळांच्या कार्याबद्दलच्या  जबाबदारीकडे  दुर्लक्ष होत असून लोकांच्या अपेक्षांचा भंग होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आणि त्याबद्दल श्री नायडू यांनी चिंता व्यक्त केली.

 

 'सुशासन दिन' म्हणून साजरा केल्या  जाणाऱ्या, माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या  97 व्या जयंती निमित्त,चेन्नईत उपराष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली.अटलजी भारताच्या राजकीय सामर्थ्याचा आविष्कार घडविणारे व्यक्तिमत्त्व  आणि  सर्वोच्च राजनीतीज्ञांपैकी  एक होते, असे राजभवन चेन्नई ,येथून पाठविलेल्या एका व्हिडिओ संदेशात श्री नायडू यांनी सांगितले.

सुशासनामुळे लोकांच्या  प्रशासनावरील  विश्वासात वृद्धी होते आणि आर्थिक स्थितीत सुधारणेचा वेग  वाढतो असे ते म्हणाले. राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सेवा यांच्यात  ‘तूट' येत असल्याचे, सांगत त्यांनी  यावर  प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या कारभाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सेवांच्या वितरणासाठी सिटीझन्स चार्टरच्या उत्तम वापराची गरज असल्याचे श्री. नायडू यांनी यावेळी अधोरेखित केले.

 

 तमिळनाडुचे राज्यपाल श्री आर. एन.रवी हे श्री वाजपेयी यांना पुष्पांजली वाहताना उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :

****

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785097) Visitor Counter : 210