शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगण्याबाबत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

Posted On: 23 DEC 2021 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

शिक्षणात तंत्रज्ञानाचा व्यापक प्रभाव लक्षात घेऊन अनेक एज्यु-टेक अर्थात तंत्रस्नेही-शिक्षण संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम, ट्यूटोरियल्स, स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन  इत्यादी सुविधा पुरवण्यास  सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालक, विद्यार्थी आणि शालेय शिक्षणातील सर्व हितधारकांनी ऑनलाइन सामग्री आणि एज्यु-टेक संस्थाचालकांकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन सुविधांची  निवड करण्याचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काय करावे आणि काय करू नये याबाबत सारासार विचार करून  निर्णय घ्यायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही कंपन्यांनी दिलेल्या मोफत सेवांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करावे लागेल. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या निदर्शनास आले आहे की काही एज्यु-टेक कंपन्या विशेषत: असुरक्षित कुटुंबांना लक्ष्य करून पालकांना मोफत सेवा देण्याच्या आणि इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण (ईएफटी) पावतीवर  स्वाक्षरी करून घेण्याचे किंवा ऑटो-डेबिट वैशिष्ट्य कार्यान्वित  करण्याचे आमिष दाखवत आहेत.

शिक्षण परिसंस्थेच्या संबंधितांनी  काय करावे आणि काय करू नये याबाबत खालील सूचना लक्षात घ्याव्यात :

 काय करावे -

  1. सदस्यत्वाचे शुल्क भरण्यासाठी ऑटो डेबिट पर्याय टाळा: काही एड-टेक कंपन्या फ्री-प्रीमियम बिझनेस मॉडेल देऊ शकतात ज्यात त्यांच्या बऱ्याच सेवा पहिल्या दृष्टीक्षेपात विनामूल्य असल्यासारखे वाटू शकतात परंतु सातत्याने शिकण्यासाठी प्रवेश मिळविण्याकरिता, विद्यार्थ्यांना सशुल्क सदस्यतेची निवड करावी लागेल. ऑटो-डेबिट सक्रिय केल्यामुळे मुले तो/ती एज्यु-टेक कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या  विनामूल्य सेवांमध्ये आपण प्रवेश करत नाही हे लक्षात न घेता सशुल्क वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करतात . 
  2. तुमचा IP पत्ता आणि/किंवा वैयक्तिक डेटा ट्रॅक केला जाऊ शकतो म्हणून सॉफ्टवेअर/डिव्हाइस शिकण्याची स्वीकृती कबूल करण्यापूर्वी अटी व शर्ती वाचा.
  3. सामग्री/अ‍ॅप खरेदी/पेनड्राईव्ह लर्निंगसह लोड केलेल्या शैक्षणिक उपकरणांच्या खरेदीसाठी टॅक्स इन्व्हॉईस स्टेटमेंट मागून घ्या 
  4. तुम्हाला ज्या एज्यु-टेक कंपनीचे सदस्यत्व घ्यायचे आहे त्याची तपशीलवार पार्श्वभूमी तपासा.
  5. एज्यु-टेककंपन्यांद्वारे प्रदान केलेल्या सामग्रीची गुणवत्ता तपासा आणि ते अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासाच्या व्याप्तीशी सुसंगत आहे आणि आपल्या मुलास सहज समजू शकेल याची खात्री करा.
  6. कोणत्याही एज्यु-टेक कंपनीमध्ये तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही रक्कम गुंतवण्यापूर्वी पेमेंट आणि सामग्रीबद्दल तुमच्या सर्व शंका/प्रश्न यांचे निरसन करा.
  7. डिव्हाइसवर किंवा ॲप किंवा ब्राउझरमध्ये पालक नियंत्रणे आणि सुरक्षा वैशिष्ट्ये सक्रिय करा कारण ते विशिष्ट सामग्रीवर प्रवेश प्रतिबंधित करण्यात आणि ॲप खरेदीवर खर्च मर्यादित करण्यात मदत करते.
  8. तुमच्या मुलाला हे समजण्यास मदत करा की शैक्षणिक ॲप्समधील काही वैशिष्ट्ये अधिक खर्च करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरली जातात. एज्यु-टेक कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या संभाव्य विपणन धोरणांबद्दल आणि परिणामांबद्दल त्यांच्याशी बोला.
  9. कोणत्याही नोंदणीकृत तक्रारी आणि विपणन युक्तींसाठी एज्यु-टेक कंपनीवर विद्यार्थी/पालकांचे परीक्षण ऑनलाइन पहा. तसेच, आपल्या सूचना आणि परीक्षण प्रदान करा जे इतरांसाठी फायदेशीर असू शकते.
  10. तक्रार दाखल करण्यासाठी पूर्ण संमतीशिवाय कोणत्याही शैक्षणिक पॅकेजसाठी स्पॅम कॉल्स/सक्तीने साइनअप केल्याचा पुरावा रेकॉर्ड करा.
  11. कोणतेही एज्यु-टेक प्लॅटफॉर्म वापरण्यापूर्वी शिक्षण मंत्रालयाने PRAGYATA मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेली  बाल सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे पहा.

(https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/pragyata-guidelines_0.pdf)

हे करू नका 

  1. एज्यु-टेक म्हणजे शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या जाहिरातींवर अंधविश्वास ठेवू नका.
  2. आपल्याला माहिती नसलेल्या कोणत्याही कर्जासाठी स्वाक्षरी करु नका.
  3. शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रतील कोणतेही मोबाईल ॲप सत्यता पडताळून घेतल्याशिवाय इन्स्टॉल करु नका.
  4. सदस्यत्व घेण्यासाठी आपल्या डेबिट वा क्रेडीट कार्डद्वारे ॲपवर नोंदणी करणे टाळा. कोणत्याही आर्थिक व्यवहारात खर्चाला मर्यादा ठरवून द्या.
  5. ई-मेल्स, संपर्क क्रमांक, कार्डची माहिती, पत्ते, इत्यादी बाबी ऑनलाईन शेअर करणे टाळा. ही माहिती विकली जाऊ शकते वा पुढील घोटाळ्यांसाठी तिचा वापर केला जाऊ शकतो.
  6. वैयक्तिक व्हिडिओ अथवा  फोटो शेअर करु नका. ॲप व्हिडीओ वैशिष्ट्य वापरत असेल किंवा सत्यता पडताळून न पाहिलेल्या प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ कॉल येत असेल तर काळजी घ्या.
  7. खोट्या भूलथापांना बळी पडून सत्यता न पडताळलेल्या अभ्यासक्रमाचे सदस्यत्व घेऊ नका.
  8. शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रसृत झालेल्या यशोगाथांवर कागदोपत्री पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. अधिक लोकांना जमा करण्यासाठीचा तो सापळा असू शकेल.
  9. पालकांच्या परवानगीविना खरेदी करू नका. ऐपमधून परस्पर खरेदी टाळण्यासाठी रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ओटीपी आधारित पेमेंट करण्याची सवय लावुन घ्या.
  10. कोणत्याही विक्रेत्याला आपले बँक खात्याचे तपशील आणि ओटीपी देऊ नका आणि सायबर गुन्ह्यांबाबत सावधगिरी बाळगा.
  11. आपणास परिचित नसलेल्या कोणत्याही लिंक वा पॉपअप स्क्रिनवर क्लिक करू नका वा अटॅचमेंट उघडू नका.

शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या सेवांबाबत त्यांच्या ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांकडून पुन्हा सादर केली जात आहे.

अधिक माहितीसाठी कृपया या लिंकवर भेट द्या

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1784582

S.Kane/V.Joshi/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784690) Visitor Counter : 1075


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil