मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

पंतप्रधानांनी आज वाराणसीमध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या अनुरूप मूल्यमापन योजनेला समर्पित पोर्टल आणि लोगोचे केले लोकार्पण


राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) मदतीने भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) विकसित केले पोर्टल आणि लोगो

Posted On: 23 DEC 2021 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

गुणवत्ता आणि अन्न-सुरक्षा हे ग्राहकांना सुरक्षित, सर्वंकष आणि आरोग्यदायी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये शाश्वत कार्यान्वयनासाठी देखील महत्त्वाचे आहे.

एनडीडीबी आणि बीआयएस अनुक्रमे प्रक्रिया आणि उत्पादनांच्या प्रमाणीकरणामध्ये कार्यरत आहेत. 

एनडीडीबी सहकारी डेअरींसाठी ब्रँड ओळख निर्माण करण्यात आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करणाऱ्या डेअरी मूल्य साखळीमधील प्रक्रिया मानकांचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांच्या डेअरी प्रकल्पांना ‘दर्जा मानक’ प्रदान करत आहे.  दुसरीकडे, बीआयएसकडे उत्पादकांसाठी उत्पादन प्रमाणन योजना आहे, यात डेअरी उत्पादन प्रक्रियेचा समावेश आहे. याद्वारे परवानाधारकांना त्यांच्या उत्पादनांवर 'ISI चिन्ह' वापरण्याची परवानगी देऊन उत्पादन स्तरावर अन्न सुरक्षा देखील सुनिश्चित केली आहे. तथापि, उत्पादन आणि प्रक्रिया प्रमाणीकरणाचे कोणतेही एकत्रीकरण झालेले नाही- ज्यामुळे डेअरी प्रकल्पांना शेवटपर्यंत प्रमाणपत्र मिळणे कठीण होते.  शिवाय दूध आणि उत्पादनांच्या गुणवत्तेबाबतही ग्राहकांची जागरूकता कमी होती.

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पुढाकाराने, भागधारकांच्या विस्तृत सल्लामसलती नंतर, बीआयएस द्वारे एनडीडीबीच्या मदतीने एक एकीकृत अनुरूप मूल्यमापन योजना तयार करण्यात आली.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे नाशवंत स्वरूप तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि पुरवठ्यामध्ये गुंतलेली विस्तृत शीत-साखळी लक्षात घेऊन ही एक नवी आणि अशा प्रकारची पहिली प्रमाणपत्र योजना आहे.  याने 'उत्पादन-अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली-प्रक्रिया' प्रमाणपत्र एका छताखाली आणले आहे. यात पूर्वीचे संबंधित लोगो बीआयएस-ISI चिन्ह आणि एनडीडीबी-गुणवत्ता चिन्ह आणि कामधेनू गाय यांचा समावेश आहे.

देशभरातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने अनुरूप मूल्यमापन योजना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,  

  • प्रमाणीकरण  प्रक्रियेचे सुलभीकरण
  • दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल लोकांना खात्री देण्यासाठी झटपट ओळखता येणारा लोगो तयार करणे
  • संघटित क्षेत्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढवणे आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
  • डेअरी क्षेत्रात दर्जेदार संस्कृती विकसित करणे

 

 

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784639) Visitor Counter : 290


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu