अर्थ मंत्रालय
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 च्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका समाप्त
सात हितसंबंधी गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 120 पेक्षा अधिक आमंत्रितांनी आठ आभासी बैठकीत घेतला सहभाग
Posted On:
22 DEC 2021 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
केंद्र सरकारच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पापूर्वी, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 15 ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान, आभासी माध्यमातून अर्थसंकल्पपूर्व बैठका झाल्या. या काळात झालेल्या, सात हितसंबंधी गटांच्या आठ बैठकांमध्ये 120 पेक्षा अधिक आमंत्रित प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या हितसंबंधी गटांमध्ये कृषी आणि कृषीप्रक्रिया केंद्रांचे प्रतिनिधी आणि तज्ञ, उद्योग, पायाभूत सुविधा आणि हवामान बदल, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार, सेवा आणि व्यापार, सामाजिक क्षेत्रे, कामगार संघटना आणि अर्थतज्ञ यांचं समावेश होता.
केंद्रीय वित्तराज्यमंत्री पंकज चौधरी आणि डॉ भागवत कराड, वित्तीय सचिव टी.व्ही. सोमनाथन, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, डीआयपीएएमचे सचिव तूहीन कंथा पांडे, कॉर्पोरेट विभागाचे सचिव देबाशीष पांडा, महसूल सचिव तरुण बजाज आणि वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकांना उपस्थित होते.
हितसंबंधी गटांनी या बैठकांमध्ये अनेक सल्ले आणि सूचना दिल्या. यात, संशोधन विकासावरील खर्च, डिजिटल सेवांविषयक पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, हायड्रोजन साठा आणि इंधन सेल विकासाला सवलती, प्राप्तीकर कायद्यातील स्तरांचे सूसूत्रीकरण, ऑनलाइन सुरक्षा उपायांयोजनांमध्ये गुंतवणूक इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
या कोविड महामारीच्या काळात, अर्थव्यवस्थेची उत्तम हाताळणी आणि जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था, म्हणून भारताचे स्थान कायम ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे सहभागी प्रतिनिधींनी स्वागत केले.
आपल्या बहुमूल्य सूचना दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिनिधींचे आभार मानले. अर्थसंकल्पात त्यांच्या सर्व सूचना गांभीर्याने घेतल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784381)
Visitor Counter : 221