महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या प्रभावाचा अभ्यास
Posted On:
17 DEC 2021 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2021
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण –V (2019-21) च्या आकडेवारीनुसार, देशात 15-49 वयोगटातील 57 टक्के महिलांना रक्तक्षय असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारसह राज्य/केंद्रशासित प्रदेश-निहाय तपशील, रक्तक्षयाचे प्राबल्य परिशिष्ट-I मध्ये दिले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘अॅनिमिया मुक्त भारत धोरण’ राबवत आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत प्रारंभापासून 22.11.2021 पर्यंत नोंदणीकृत लाभार्थींची संख्या आणि मातृत्व लाभासाठी वितरित केलेली एकूण रक्कम याची वर्षनिहाय आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय माहिती परिशिष्ट-II मध्ये आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील कार्यशाळांद्वारे आढावा घेतला जातो. या योजनेच्या अंमलबजावणीत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना भेडसावणार्या परिचालन संबंधी अडचणी तत्परतेने परस्पर/तांत्रिक चर्चेद्वारे सोडवल्या जातात. योजनेची अंमलबजावणी अधिक तीव्र करण्यासाठी आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करण्यासाठी मंत्रालय दरवर्षी ‘मातृ वंदना सप्ताह’ साजरा करते. प्रभातफेरी, पथनाट्ये, वृत्तपत्रात जाहिराती, रेडिओ जिंगल्स प्रसारित करणे, सेल्फी मोहीम, घरोघरी भेट मोहीम, क्षेत्रीय स्तरावरील सामुदायिक कार्यक्रम यांसारखे विविध माहिती शिक्षण संवाद आणि वर्तणूक बदल (BCC) उपक्रम राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतले आहेत.
महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782850)
Visitor Counter : 206