आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महिलांमधील क्षयरोगावरच्या राष्ट्रीय संसदीय परिषदेचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्‌घाटन


महिलांमधील क्षयरोगावरच्या राष्ट्रीय संसदीय परिषदेला डॉ मनसुख मांडवीया यांनी केले संबोधित, “2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार अथक परिश्रम करत आहे.”- मांडवीया

Posted On: 16 DEC 2021 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

उपराष्ट्रपती एम  व्यंकय्या  नायडू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, महिलांमधील क्षयरोगावरील राष्ट्रीय संसदीय परिषदेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मंडाविया, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार, केंद्रीय महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मंजुपारा महेंद्रभाई उपस्थित होते.

भारतात क्षयरोगाचे असलेले मोठे आव्हान आणि पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असले तरी, अभ्यासातून असे लक्षात आले आहे की क्षयरोगाचे उपचार घेण्यात पुरुषांपेक्षा महिला मागे असतात, ही  गंभीर बाब  लक्षात घेता, महिलांमध्ये याबाबत जागृती करण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले.

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे स्मरण उपराष्ट्रपतींनी यावेळी सर्वांना करुन दिले. या विषयाबाबत, सामाजिक दृष्टीकोन बाळगत, समाजातल्या सर्व स्तरातील, स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन एक ‘लोकचळवळ उभारणे आवश्यक असून, त्याद्वारे 2025 पर्यंत आपण क्षयरोगाचे उच्चाटन करु शकू, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.उत्तम आणि पोषक आहार, स्वच्छ हवा सर्वांना मिळावी आणि या आजाराबाबत असलेले समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.

क्षयरोग, भारतातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी मोठे आव्हान आहे. देशात दरवर्षी अंदाजे 24.8 लाख नवे क्षयरोगी आढळून येतात, आणि चार लाखांहून अधिक लोकांचा या आजारामुळे बळी जातो, असा अंदाज आहे. देशात दरवर्षी 10 लाखांहून जास्त महिला आणि मुली, तसेच 3 लाखांहून जास्त मुलांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. गर्भवती महिलांना संक्रमण होण्याचा अधिक धोका असल्याने आणि गर्भ तसेच प्रसुतीनंतर शिशुंवर होऊ शकणाऱ्या गंभीर परिणामांमुळे ही समस्या अधिकच जटील बनत जाते. असे यावेळी मनसुख मंडवीया यांनी सांगितले.

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1782454) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi