कोळसा मंत्रालय

कोळसा खाणी लिलावाच्या चौथ्या टप्प्याचे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते उद्‌घाटन


24 नव्या खाणींसह एकूण 99 कोळसा खाणी लिलावासाठी खुल्या

Posted On: 16 DEC 2021 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसददीय व्यवहार मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या कोळसा खाणींच्या लिलावाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन केले. या टप्प्यात, 24 नव्या खाणींसह, एकूण 99 खाणी लिलावासाठी खुल्या केल्या गेल्या आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी याआधी कोळसा खाणींची बोली जिंकली आहे, त्यांनी लवकरात लवकर उत्खनन सुरु करावे, जेणेकरुन देश या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकेल,असे जोशी यावेळी म्हणाले. त्याशिवाय, लिलावासाठी आणखी कोळसा खाणींचा शोध घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. पुढची 30-40 वर्षे तरी, देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी कोळसा महत्वाचा असणार आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. कोळसा मंत्रालयाने ही लिलाव प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक केली असून, अधिकधीक गुंतवणूकदारांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पहिल्या दोन टप्प्यात, 28 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव झाल्यानंतर, तसेच, सीएम (एसपी) कायद्याअंतर्गत, 20 कोळसा खाणींसाठी 53 बोली आल्यानंतरतिसऱ्या टप्प्याअंतर्गत, कोळसा मंत्रालयाने,24 नव्या कोळसा मंत्रालयाची लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. व्यावसायिक लिलाव प्रक्रियेच्या तिसऱ्या प्रक्रियेपासून,आणि दुसऱ्या टप्प्यातील काही खाणींच्या व्यावसायिक लिलावाचा प्रयत्न म्हणूनएकूण 99 कोळसा खाणींचा लिलाव केला जाणार आहे.

एकूण 99 खाणींपैकी, 59 खाणींमधील शोध, अनुमान पूर्ण झाले असून, 40 अंशतः संशोधित आहेत.या खाणी महाराष्ट्रासह, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत आहेत.

सविस्तर चर्चेनंतर, या खाणी निश्चित करण्यात आल्या आहेत. संरक्षित क्षेत्रे,वन्यजीव अभयारण्ये, महत्त्वाचे अधिवास, तसेच, जिथे  वन आच्छादन 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे तसेच जिथे भरपूर बांधकाम झाले आहे, अशा सर्व क्षेत्रांना या लिलावातून वगळण्यात आले आहे.

या लिलावप्रक्रियेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजेराष्ट्रीय कोळसा निर्देशांकांची सुरुवात, लिलालवंत सहभागी होणाऱ्या कंपन्यांसाठी कोळसा उत्पादनाची अट शिथिल करण्यात आली आहे, कोळशाच्या वापरासाठी दिलेली लवचिकता, सर्वात उत्तम अशी पेमेंट संरचना, प्रोत्साहन आणि सवलतींच्या माध्यमातून लवकर उत्पादनासाठी कार्यक्षमता वाढवण्याची योजना, स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान, अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. या क्षेत्रात सातत्य राहावे यासाठी कोळसा मंत्रालयाकडून, लवकरच आणखी काही सवलती दिल्या जाण्याची अपेक्षा आहे.

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1782445) Visitor Counter : 175


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia