रेल्वे मंत्रालय

रेल्वेने नवीन आधुनिक तेजस डब्यांसह 4 राजधानी एक्सप्रेस गाड्या चालवायला केली सुरुवात


विशेष तेजस-गटातील स्मार्ट स्लीपर कोच असलेला पहिला डबा भारतीय रेल्वेमध्ये जुलै 2021 मध्ये समाविष्ट करण्यात आला

लांब पल्‍ल्‍याच्‍या प्रवासासाठी तेजस कोचचा वापर प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी एक आमूलाग्र बदल आहे

Posted On: 16 DEC 2021 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2021

भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांचे नवीन आधुनिक तेजस गाड्यांमध्ये रूपांतर करून अधिक आरामदायी सोयीसुविधांसह रेल्वे प्रवासाचे नवे युग सुरू केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या आधुनिक तेजस स्लीपर प्रकारातील गाड्या हा प्रवासाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी एक आमूलाग्र बदल आहे.

Train No.

Route

Zonal Railway

20501/02

Agartala-AnandViharRajdhani Express

NFR

12951/52

Mumbai-New Delhi Rajdhani Express

WR

12953/54

Mumbai – Nizamuddin August KrantiRajdhani

WR

12309/10

Rajendra Nagar- New Delhi (Patna Rajdhani) Express

ECR

सध्या, भारतीय रेल्वे तेजस स्लीपर कोचेससह चार राजधानी गाड्या चालवत आहे.

भारतीय रेल्वेच्या एलएचबी प्लॅटफॉर्मवर स्लीपर कोचसह अत्याधुनिक तेजस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक गाड्यांमध्ये पुढील प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत:

  • स्वयंचलित प्रवेश दरवाजे
  • PA/PIS (प्रवासी घोषणा/प्रवासी माहिती प्रणाली)
  • आग आणि धूर शोध आणि शमन प्रणाली
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • सुधारित शौचालय- जैव-शौचालयांसह व्हॅक्यूम असिस्टेड फ्लशिंग, उच्च दर्जाची टॉयलेट फिटिंग, टच फ्री सोप डिस्पेंसर, बसण्यासाठी विशेष कक्ष
  • एलईडी दिवे
  • सुरेख रंगसंगती

तेजस डब्यांसह सुधारित पहिली राजधानी गाडी दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेने जुलै 2021 मध्ये चालवली होती.

 

 S.Tupe/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1782336) Visitor Counter : 193


Read this release in: English , Hindi , Punjabi