सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भिक्षेकऱ्यांबाबतचे सर्वेक्षण

Posted On: 14 DEC 2021 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021

 

देशात 2011 मधे झालेल्या जनगणनेनुसार, 4,13,670 भिक्षेकरी आणि बेघर आहेत. यामधे महाराष्ट्रातील एकूण  24,307 भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे. 

यात 14020 पुरुष तर 10287 महिला आहेत. राज्यवार माहिती परिशिष्टात दिली आहे. 

भिक्षेकऱ्यांच्या सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था/तज्ञ/राज्यांसोबत एक बैठक 14.01.2020 रोजी आयोजित करण्यात आली होती.

मंत्रालयाने चर्चेनंतर, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, इंदूर, लखनौ, नागपूर आणि पाटणा या सात शहरांमध्ये भीक मागण्या संबंधित कामात गुंतलेल्या व्यक्तींच्या सर्वसमावेशक पुनर्वसनावर पथदर्शी प्रकल्प सुरू केला. 

हे पथदर्शी प्रकल्प राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश/स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या सहकार्याने कार्यान्वित केले जात आहेत.  सर्वेक्षण आणि नोंद करणे, एकत्रीकरण, पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, जागरूकता निर्माण, समुपदेशन, शिक्षण, कौशल्य विकास आणि भीक मागणाऱ्या व्यक्तींची शाश्वत वस्ती यासह सर्वसमावेशक उपाय याद्वारे प्रदान केले जातात.  

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने "स्माइल - उपजीविका आणि उपक्रमासाठी उपेक्षित व्यक्तींकरता सहाय्य" योजना तयार केली आहे, ज्यात - 'भीक मागणाऱ्या व्यक्तींच्या सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी केंद्रीय क्षेत्र योजना' ही उप-योजना समाविष्ट आहे.

या योजनेत भीक मागण्याऱ्या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक व्यापक उपायांचा समावेश आहे.  पुनर्वसन, वैद्यकीय सुविधांची तरतूद, समुपदेशन, मूलभूत दस्तावेजीकरण, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक संबंध इत्यादींवर या योजनेचा भर आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

 

S. No.
 

India/State/UT

Beggars, Vagrants etc.

Persons

Males

Females

 

 

 

 

 

1

JAMMU & KASHMIR

4134

2550

1584

2

HIMACHAL PRADESH

809

504

305

3

PUNJAB

7939

5197

2742

4

CHANDIGARH

121

87

34

5

UTTARAKHAND

3320

2374

946

6

HARYANA

8682

6504

2178

7

NCT OF DELHI

2187

1343

844

8

RAJASTHAN

25853

15271

10582

9

UTTAR PRADESH

65835

41859

23976

10

BIHAR

29723

14842

14881

11

SIKKIM

68

46

22

12

ARUNACHAL PRADESH

114

59

55

13

NAGALAND

124

65

59

14

MANIPUR

263

117

146

15

MIZORAM

53

33

20

16

TRIPURA

1490

607

883

17

MEGHALAYA

396

172

224

18

ASSAM

22116

7269

14847

19

WEST BENGAL

81244

33086

48158

20

JHARKHAND

10819

5522

5297

21

ODISHA

17965

9981

7984

22

CHHATTISGARH

10198

4995

5203

23

MADHYA PRADESH

28695

17506

11189

24

GUJARAT

13445

8549

4896

25

DAMAN & DIU

22

15

7

26

DADRA & NAGAR HAVELI

19

7

12

27

MAHARASHTRA

24307

14020

10287

28

ANDHRA PRADESH

30218

16264

13954

29

KARNATAKA

12270

6436

5834

30

GOA

247

131

116

31

LAKSHADWEEP

2

0

2

32

KERALA

4023

2397

1626

33

TAMIL NADU

6814

3789

3025

34

PUDUCHERRY

99

54

45

35

A & N ISLANDS

56

22

34

 

INDIA

4,13,670

2,21,673

1,91,997

 

* * *

M.Chopade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1781410) Visitor Counter : 241


Read this release in: Tamil , English , Urdu