वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
लघु उद्योग आणि निर्यातदारांना दिलासा देण्याच्या शक्यतांचा शोध घेण्याचे पियुष गोयल यांचे पोलाद उत्पादकांना आवाहन
लघु आणि मध्यम उद्योग तसेच निर्यातदारांना पाठबळ देण्यासाठी परवडणारे उपाय शोधण्याचे पोलाद उद्योगातील हितसंबंधितांचे आश्वासन
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2021 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2021
पोलाद उत्पादकांनी लघु उद्योग आणि निर्यातदारांना दिलासा देण्याच्या शक्यतांचा शोध घ्यावा असे आवाहन, वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी आज केले.

पोलाद उद्योग आणि प्रत्यक्ष उद्योग वापरकर्त्या सहभागींचा समावेश असलेली बैठक आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. पोलादाच्या कच्च्या मालाच्या किमतींबाबत लघु उद्योग आणि निर्यातदारांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पोलादाचा पुरवठा सुलभ आणि किफायतशीर होण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे यावेळी बोलताना गोयल यांनी सांगितले. त्यांनी पोलाद उद्योगातील हितसंबंधितांना उत्पादन खर्चाचे मूल्यांकन करण्यास तसेच घटक आणि इतर अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून पोलादाचा वापर करून लघु उद्योगांना दिलासा देण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यास सांगितले.

पोलाद उद्योग हितसंबंधितांनी लघु आणि मध्यम उद्योगांना तसेच निर्यातदारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी विशेषतः महामारीच्या पार्श्वभूमीवर, लघुउद्योग आणि निर्यातदारांना आव्हानांना तोंड देण्यासाठी परवडणारे उपाय शोधण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण तातू राणे, भारतीय पोलाद प्राधिकरणाच्या अध्यक्ष सोमा मंडल, राष्ट्रीय पोलाद निगम लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अतुल भट्ट, जेएसडब्ल्यू स्टील लि चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल, टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन, भारतीय निर्यातदार संघटना महासंघाचे (एफआयईओ), महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय शाई, वाहन घटक उत्पादन संघटनेचे (एसीएमए) मोहित जौहरी, अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष महेश देसाई , अखिल भारतीय सायकल उत्पादक संघटनेचे सरचिटणीस डॉ. केबी ठाकूर आणि संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1779925)
आगंतुक पटल : 239