वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आगामी 5 वर्षांत प्लास्टिक उद्योगाची उलाढाल सध्याच्या 3 लाख कोटींवरून 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट - पीयूष गोयल


प्लास्टिक उद्योगाने रोजगार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे – गोयल

सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांसाठी प्लास्टिकच्या कच्च्या मालाचा खात्रीशीर पुरवठा हवा

Posted On: 07 DEC 2021 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2021

आगामी  5 वर्षांत प्लास्टिक उत्पादन उद्योगाने सध्याची  3 लाख कोटींची उलाढाल  10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. प्लॅस्टिक यंत्रसामग्रीचे  उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची प्रचंड क्षमता भारतात आहे, असे ते म्हणाले.  वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल,यांनी देशातील प्लास्टिक उद्योगाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि  या क्षेत्राची कामगिरी आणि क्षमता आणखी वाढवण्यासाठी या उद्योगातील हितसंबंधीतांची  मते आणि सूचना ऐकल्या.

यावेळी बोलताना  गोयल म्हणाले कीप्लास्टिक उद्योग हा देशातील सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे.आता या उद्योगाच्या उलाढालीत अपेक्षित वाढ होऊन पाच वर्षात रोजगार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.

प्लास्टिक उद्योगातील सहभागींनी गुणवत्तेवर भर द्यावा अशा सूचना गोयल यांनी केल्या. वापरलेली यंत्रसामग्री  पुन्हा  वापरण्यावर अवलंबून राहणे हा मार्ग नाही.कमी दर्जाच्या यंत्रसामग्रीमुळे  केवळ निकृष्ट उत्पादनांचे उत्पादन होईल,जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी, सर्व प्रकारच्या उत्पादनासाठी जागतिक दर्जाची यंत्रसामग्री वापरणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. प्लास्टिक सामग्रीची सर्वोत्तम चाचणी सुनिश्चित करण्यासाठी भारतीय मानक विभाग  आवश्यक तिथे  प्रयोगशाळा स्थापन करेल, असे त्यांनी सांगितले.

सूक्ष्म. लघु आणि मध्यम उद्योगांना  स्पर्धा करण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी  कच्च्या मालाचा खात्रीशीर पुरवठा होईल हे  आपण सर्वांनी हे सुनिश्चित केले पाहिजे.प्रचंड रोजगार निर्माण करणाऱ्या  आणि लाखोंच्या उपजीविकेचा आधार असणाऱ्या  सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना  सर्व  हितसंबंधितांनी जास्तीत जास्त पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे गोयल म्हणाले.

या बैठकीला पेट्रोकेमिकल आणि प्लॅस्टिक क्षेत्रातील विविध उद्योग आणि व्यापार संस्थांचे प्रमुख आणि भारतीय सामग्री पुनर्वापार संघटना  तसेच भारत सरकारचे संबंधित मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.केंद्र सरकार या क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे, असे गोयल यांनी उपस्थितांना सांगितले. 

 

  

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779053) Visitor Counter : 232


Read this release in: English , Urdu , Hindi