अर्थ मंत्रालय
कोविड -19 महामारीच्या काळात राज्यांना देण्यात आलेली जीएसटी भरपाई
Posted On:
07 DEC 2021 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2021
वस्तू आणि सेवा कर (राज्यांना भरपाई) अधिनियम, 2017 च्या तरतुदींनुसार, 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांसाठी वस्तू आणि सेवा करापोटीची भरपाई राज्यांना यापूर्वीच अदा करण्यात आली आहे.केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे वस्तू आणि सेवा कर संकलन आणि त्याच वेळी जीएसटी भरपाई उपकर संकलन कमी झाल्यामुळे अधिक भरपाईची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे ते पुढे म्हणाले. अलीकडेच , केंद्राने 03.11.2021 रोजी राज्यांना जीएसटी भरपाईपोटी भरपाई निधीतून ₹ 17,000 कोटी रुपये जारी केले.राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जारी केलेल्या वस्तू आणि सेवा कर भरपाईचे तपशील परिशिष्टातील तपशीलानुसार आहेत.जीएसटी भरपाई निधीमधील रक्कम संपूर्ण भरपाईची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती, त्यामुळे त्यात भर घालून एप्रिल'20 ते मार्च’21 या कालावधीसाठी देय भरपाईची अंशतः पूर्तता करण्यासाठी विधीमंडळासह राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 1,13,464 कोटीं रुपये जारी करण्यात आले,असे मंत्री म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी यांनी सांगितले की, वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 41व्या, 42व्या आणि 43व्या बैठकीमध्ये महामारीच्या आर्थिक परिणामांमुळे भरपाई निधीमध्ये उपकर संकलनात आलेली कमी आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई निधी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.जीएसटी भरपाईमध्ये तूट निर्माण झाल्यामुळे जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक स्त्रोतांची पूर्तता करण्यासाठी बॅक टू बॅक म्हणजेच समांतर कर्ज म्हणून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी ₹1.1 लाख कोटी आणि आर्थिक वर्ष 2021-22 साठी ₹1.59 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.आर्थिक वर्षात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना भांडवली खर्च करण्यासाठी ही रक्कम अग्रक्रमाने जारी करण्यात आले. याव्यतिरिक्त, भरपाई निधीमध्ये उपलब्ध असलेल्या रकमेवर अवलंबून, जीएसटी महसूलातील कमतरता भरून काढण्यासाठी, केंद्र सरकार राज्यांना नियमित जीएसटी भरपाई देखील केली जात आहे.
R. Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778997)
Visitor Counter : 239