पर्यटन मंत्रालय

कोविड युगानंतर पर्यटन क्षेत्राच्या कायाकल्पाचे कारण यशस्वी कोविड लसीकरण प्रकल्प हे आहे: केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी


अग्वादा किल्ला, से कॅथेड्रल आणि कुर्डी महादेव मंदिरात येणाऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

Posted On: 04 DEC 2021 7:00PM by PIB Mumbai

 

पणजी, 04 डिसेंबर 2021

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री  जी किशन रेड्डी यांनी आज उत्तर गोव्यातील अप्पर फोर्टअग्वादा येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात कोंडोलीमधील फोर्ट अग्वादा, जुने गोव्यातील से  कॅथेड्रल आणि कुर्डी येथील महादेव मंदिर इथल्या विकासकामांसाठी अभ्यागतांच्या सुविधा आणि रोषणाईसाठी पायाभरणी फलकांचे अनावरण केले.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या देखरेखीखाली राष्ट्रीय संस्कृती कोष यांच्यासह इंडियन ऑइल फाउंडेशनने अनेक विकासकामे केली  आहेत. पुरातत्व सर्वेक्षण विभाग  गोवा मंडळाअंतर्गत वर नमूद केलेल्या ठिकाणी पर्यटक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या सुविधांमध्ये पार्किंग, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अभ्यागतांच्या सोयीसाठी  मार्ग, लँडस्केपिंग, बसण्यासाठी आसने, सुशोभित कमानी, विद्युत रोषणाई, फलक  इत्यादींचा समावेश आहे.

गोव्याच्या स्वातंत्र्याची 60 वर्षे आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असा सुंदर योग जुळून आल्याचे सांगत रेड्डी म्हणाले.  कोविड19 चा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. देशात गोवा हे सर्वाधिक पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे सर्वाधिक तेच यामुळे  प्रभावित राज्य होते. महामारीमुळे  गोव्यावर कितीही संकट आले तरी केंद्र सरकार गोवा सरकार आणि गोव्यातील जनतेच्या पाठीशी उभे राहील, असे रेड्डी यांनी सांगितले. 

भारत सरकारच्या यशस्वी लसीकरण धोरणामुळे पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. पर्यटन स्थळांच्या विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंतीही मंत्र्यांनी राज्य सरकारच्या विभागांना केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका व्हिडिओ संदेशात गोवा राज्याला दिलेल्या सर्व मदतीबद्दल केंद्र सरकार आणि केंद्रीय  पर्यटन व  सांस्कृतिक मंत्र्यांचे आभार  मानले.

एएसआयच्या गोव्यातील तीन स्थळांवर  विकासात्मक कामे हाती घेतल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री  हरदीप सिंग पुरी यांनी एका व्हिडिओ संदेशात,इंडियन ऑइल फाऊंडेशनचे आभार मानले.

पर्यटन क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने राज्यातील पर्यटन स्थळांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे  केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.  गोव्यातील पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.

बंदरे आणि ग्रामीण विकास मंत्रीगोवा सरकार  मायकल लोबो, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मिश्रा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण प्रादेशिक संचालक (दक्षिण)डॉ जी माहेश्वरी, आणि भारत पर्यटन, गोवा पर्यटन विकास महामंडळ व एएसआयचे  वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय संस्कृती कोष  आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अमूर्त वारशाचे जतन करण्याच्या उद्देशातील कामात सहभागी होण्याचे आवाहन करत सहकार्याला चालना देतो.  एएसआयच्या तीन स्थळांवरील  प्रकल्पांना इंडियन ऑइल फाउंडेशनद्वारे निधी दिला जात आहे.

***

Jaydevi PS/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778073) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu