सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
तृतीयपंथियांसाठी गरिमा गृह
Posted On:
30 NOV 2021 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021
सामाजिक न्याय मंत्रालयाने तृतीयपंथियांसाठी 12 गरिमा गृह-प्रायोगिक निवारागृहे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून या निवारा गृहांच्या उभारणीसाठी समुदाय आधारित संस्थांना (CBOs) आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. ही प्रायोगिक निवारागृहे महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने "स्माइल - उपजीविका आणि उद्योगांसाठी उपेक्षित व्यक्तींसाठी सहाय्य " ही योजना आखली आहे, ज्यामध्ये - 'तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी व्यापक पुनर्वसन' ही उपयोजना समाविष्ट आहे. या उप-योजनेतील एक घटक म्हणजे प्रत्येक राज्यात किमान एक गरिमा गृह स्थापन करण्याच्या उद्देशाने गरिमा गृह (ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवारा गृह) उभारणे हा आहे.
राजस्थान राज्यातील जयपूर येथे एक गरिमा गृह आधीच कार्यरत आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776533)
Visitor Counter : 203