संरक्षण मंत्रालय
व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
30 NOV 2021 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021
व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, एव्हीएसएम ,व्हीएसएम यांनी आयएनएस शिक्रा येथे आयोजित एक दिमाखदार संचलनात ऍडमिरल आर हरी कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम , एडीसी ADC यांच्याकडून फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC-in-C), पश्चिम नौदल कमांड (WNC) म्हणून पदभार स्वीकारला.
पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, व्हाइस ऍडमिरल एबी सिंग यांनी पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे . भारतीय नौदलाच्या दोन्ही ऑपरेशनल कमांडचे नेतृत्व करण्याचा अतुलनीय सन्मान मिळालेल्या मोजक्या कमांडर-इन-चीफपैकी ते आहेत
व्हाईस ऍडमिरल एबी सिंग यांनी मुंबईतील नौदल गोदी येथील गौरवस्तंभ-सागरी विजय स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान दिलेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहिली.
1 जुलै 1983 रोजी नौदलात नियुक्त झालेले, व्हाईस ऍडमिरल एबी सिंग हे नेव्हिगेशन आणि दिशा तज्ञ आहेत. ते यूपी सैनिक स्कूल, लखनौ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासलाचे माजी विद्यार्थी असून , त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे स्टाफ कोर्स दरम्यान मद्रास विद्यापीठातून त्यांची पहिली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली ज्यामध्ये त्यांना स्कडर पदक देखील देण्यात आले. 2005 मध्ये ब्रिटनच्या क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी, येथून त्यांनी जागतिक सुरक्षामध्ये मास्टर्स पदवी देखील मिळवली.
अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी असलेल्या अजेंद्र सिंग यांनी आपल्या नौदल कारकिर्दीत अनेक प्रमुख परिचालन , कर्मचारी आणि प्रशिक्षण नियुक्त्या केल्या आहेत. ते आयएनएस कमोर्टा (ऑप पवन दरम्यान) आणि विनाशक आयएनएस रणजितचे नेव्हिगेटिंग अधिकारी होते, शिवाय ऑपरेशन पराक्रम दरम्यान वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट नेव्हिगेटिंग ऑफिसर होते. त्यांना अनेक नियुक्त्यांदरम्यान पश्चिम नौदल कमांडमध्ये विविध पदांवर काम करण्याचा प्रचंड अनुभव आहे. त्यांचे चारही ऑपरेशनल कमांड मुंबई येथील जहाजांवर होते - भारतीय नौदल जहाज वीर (क्षेपणास्त्र जहाज), विंध्यगिरी (फ्रिजेट), त्रिशूल (मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिजेट ) आणि विराट (विमानवाहू ). ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि कोची येथील नेव्हिगेशन अँड डायरेक्शन स्कूलमध्ये आणि वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज येथे डायरेक्टिंग स्टाफचे प्रशिक्षकही होते.
त्यांना 2012 मध्ये रिअर ऍडमिरल या पदावर पदोन्नती मिळाली आणि नौदल मुख्यालयात सहाय्यक नौदल प्रमुख (धोरण आणि योजना) या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित ईस्टर्न फ्लीटचे नेतृत्व केले
2015 मध्ये व्हाईस ऍडमिरल म्हणून पदोन्नती मिळाल्यावर, त्यांनी डेप्युटी -कमांडर-इन-चीफ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड, पश्चिम नौदल मुख्यालय, मुंबई आणि नंतर एकात्मिक संरक्षण उपप्रमुख म्हणून काम केले.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776523)
Visitor Counter : 283