नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बंदरांमधील निर्यात-आयात मालवाहतुकीची वार्षिक क्षमता

Posted On: 30 NOV 2021 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021

 

आर्थिक वर्ष 2013-14 पर्यंत देशात 12 प्रमुख बंदरे आणि 200 बिगर प्रमुख बंदरे होती. प्रमुख बंदरांची वार्षिक मालवाहू हाताळणी क्षमता 800.52 दशलक्ष टन आणि बिगर प्रमुख बंदरांची वार्षिक 599.47 दशलक्ष टन (MTPA) होती. वर्ष 2013-14 मध्ये सर्व भारतीय बंदरांची एकूण क्षमता 1399.99 MTPA होती.

प्रमुख बंदरांचा विचार करता, सन 2014 नंतर कोणतेही नवीन मोठे बंदर बांधले गेले नाही. प्रमुख बंदरांची क्षमता वाढवणे / अद्ययावत करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. बिगर प्रमुख बंदरे ही संबंधित राज्य सागरी मंडळे / राज्य सरकारांच्या अधिकारक्षेत्रात आहेत.

वर्ष 2020-21 मध्ये प्रमुख बंदरांवर माल हाताळण्याची क्षमता 1560.61 MTPA होती आणि बिगर प्रमुख बंदरांसाठी ती 1002.24 MTPA होती. 31-3-2021 रोजी सर्व भारतीय बंदरांची एकूण क्षमता 2562.85 MTPA होती. 2020-21 या वर्षात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्रमुख बंदरांनी मिळविलेले एकूण परिचालन उत्पन्न 14,688.80 कोटी रुपये होते, जे 2013-14 मध्ये 9,162.80 कोटी रुपये होते. प्रमुख बंदरांचे एकूण उत्पन्न 2020-21 मध्ये 16,419.27 कोटी रुपये होते, जे 2013-14 मध्ये 11,171.97 कोटी रुपये होते.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776499) Visitor Counter : 283


Read this release in: English , Tamil , Telugu