अल्पसंख्यांक मंत्रालय

नया सवेरा योजनेअंतर्गत लाभ मिळालेले विद्यार्थी

Posted On: 29 NOV 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021

 

शीख, जैन, मुस्लीम, ख्रिश्चन,बुद्ध,आणि पारशी या सहा वर्गीकृत अल्पसंख्यक समुदायांतील विद्यार्थी/उमेदवारांसाठी केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालय मोफत शिकवणी तसेच संबंधित योजना (नया सवेरा) राबवीत आहे आणि त्याद्वारे या विद्यार्थ्यांना तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ मधील नेमणुकीसाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारांतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका,विमा कंपन्या आणि स्वायत्त संस्था यांच्यातील इतर समकक्ष पदांसाठी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्र ठरण्यासाठी विशेष शिकवणी दिली जात आहे. प्रकल्प अंमलबजावणी संस्था अथवा बिगर-सरकारी संघटनांच्या मार्फत देशभरात ही योजना राबविली जात आहे.

2017-18 ते 2020-21 या गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सहा वर्गीकृत अल्पसंख्यक समुदायांतील एकूण 36,839 विद्यार्थी/उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या चार वर्षात लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांचे राज्यनिहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत. लाभार्थींची धर्म-निहाय माहितीची नोंद या योजनेत ठेवली जात नाही.  

ही योजना सुरु झाल्यापासून तिच्या अंमलबजावणीसाठी 344.24 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

अल्पसंख्यक समुदायातील वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी/उमेदवारांच्या कल्याणासाठी ‘नया सवेरा’ ही योजना राबविण्यात येते आणि शहरी तसेच ग्रामीण विभागांसाठी कोणतेही विशेष श्रेणीकरण केले जात नाही. या योजनेतील 30% जागा अल्पसंख्यक समुदायांतील मुलींसाठी राखीव ठेवल्या जातात.

परिशिष्ट 

Annexure

State-wise details of students of minority communities benefitted under the Naya Savera Scheme (NSS) of Government during last four years (FY 2017-18 to FY 2020-21)

States / UTs

No. of students

Andhra Pradesh

1560

Assam

150

Bihar

200

Chandigarh

540

Chhattisgarh

300

Delhi

1023

Gujarat

1968

Haryana

860

Jammu and Kashmir

640

Jharkhand

360

Karnataka

4718

Kerala

1930

Madhya Pradesh

2195

Maharashtra

3930

Manipur

350

Meghalaya

410

Punjab

1400

Rajasthan

1330

Tamil Nadu

850

Telangana

1750

Uttar Pradesh

8345

West Bengal

2030

 

केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.


* * *

G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776245) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Kannada