अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये स्थूल जीएसटी संकलनाने वाढीचा कल दर्शवला

Posted On: 29 NOV 2021 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021 

 

कोविड-19 महामारीच्या उद्रेकानंतर आर्थिक वर्ष 2021-22 मध्‍ये स्थूल जीएसटी संकलनात वाढता कल दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना, त्यांनी नमूद केले की आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 साठी (ऑक्टोबर 2021 पर्यंत) एकूण जीएसटी संकलन पुढीलप्रमाणे : -

Month

FY 2020-21 (Rs. in crore)

FY 2021-22 (Rs. in crore)

April

32172

139708

May

62151

102709

June

90918

92849

July

87422

116393

August

86449

112020

September

95480

117010

October

105155

130127

November

104963

--

December

115174

--

January

119875

--

February

113143

--

March

123902

--

Total

1136805

810816

 

आर्थिक वर्ष 2021-22 साठी एकूण प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी देताना, ते म्हणाले कीआर्थिक वर्ष 2021-22 साठी 23.11.2021 पर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 815262.7 कोटी रुपये असून ते आर्थिक वर्ष 2021-22 आणि 2019-20 मधील याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 48.11% आणि 18.15% ची वाढ दर्शवतात. आर्थिक वर्ष 2021-22 साठी 23.11.2021 पर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 692833.6 कोटी रुपये असून , परिशिष्ट-I नुसार आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2019-20 मधील याच कालावधीतील निव्वळ संकलन आकडेवारीच्या तुलनेत अनुक्रमे 67.93% आणि 27.29% वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776232) Visitor Counter : 286


Read this release in: Telugu , English , Urdu