संरक्षण मंत्रालय
भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह फोकस्ड ऑपरेशन यांचे आयोजन
Posted On:
28 NOV 2021 3:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021
भारत, मालदीव आणि श्रीलंका या तीनही देशांतील आघाडीच्या सागरी सुरक्षा संस्थांची पहिले'कोलंबो सुरक्षा कॉन्क्लेव्ह (सीएससी) फोकस्ड ऑपरेशन दिनांक 28 आणि 29 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात आयोजित करण्यात आले आहे. यात भारतीय नौदल (आय एन,IN) मालदीव राष्ट्रीय सुरक्षा दल,(एमएनडीएफ, MNDF) आणि श्रीलंका नौदल (SLN)या देशातील लढाऊ नौका आणि विमाने सहभागी होणार असून या तीनही देशांच्या दक्षिण भागातील अरबी समुद्राच्या व्यापक भूभागातील विशेष आर्थिक क्षेत्र संरक्षण कार्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
यानिमित्ताने अशाच प्रकारचे त्रिस्तरीय टेबल टॉप कवाायती (एक्सरसाईझेस टीटीएक्स,TTX) आयएन,एमएनडीएफ आणि एसएन यांच्यात 14 आणि 15 जुलै 2011 रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या याची आठवण व्हावी. हिंदी महासागरातील प्रदेशाची सागरी सुरक्षितता वाढविण्याच्या उपाययोजनांवर विचार विनिमय करण्यासाठी हे तीनही देश दिनांक 04 ऑगस्ट 2021रोजी झालेल्या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह या परीषदेच्या 5 व्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारांच्या बैठकीत (एनएसए) सहभागी झाले होते .
कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह फोकस्ड ऑपरेशन चा उद्देश हिंदी महासागर या महत्वाच्या प्रदेशाची सुरक्षितता वाढविणे, व्यावसायिक नौवहन सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दिंगत करणे आणि सागरी क्षेत्रात वैध हालचाली करण्यास मान्यता देणे हे आहे.
ऑपरेशनवर लक्ष केंद्रित केल्याने महत्वाच्या समुद्री सुरक्षा एजन्सीजना समजून घेणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात मदत होईल आणि या क्षेत्रातील गुन्हे टाळणे आणि दडपून न ठेवता त्यावर सुलभ उपाययोजना करण्यास मदत होईल. यामुळे समुद्रात उद्भवणारे कठीण प्रसंग/ अपघात हाताळण्यासाठी केलेल्या एकत्रित कार्याची एकमेकांना माहिती देऊन आचरणाची पूर्ती करत संचालनातील समन्वयात वाढ होईल.
'सीएससी फोकस ऑपरेशन' चे हे आयोजन भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यातील त्रिसंघटीत गहन क्षेत्रीय प्रतिबद्धतेचे उदाहरण असून त्यांच्या शांती आणि सुरक्षिततेला प्रोत्साहित देण्याच्या वचनबद्धतेवर त्याचा भर आहे.
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775824)
Visitor Counter : 372