माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav
iffi banner

सूर्यप्रकाश, बीच आणि समुद्रापेक्षा बरेच काही गोव्यात असून मी माझ्या चित्रपटांमधून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे: जितेंद्र शिकेरकर, इफ्फी 52 गोवा विभागातील चित्रपट "डिकोस्टा हाऊस" चे दिग्दर्शक


"कोकणी भाषा टिकावी यासाठी केवळ भाषेवरील प्रेमापोटी कोकणी चित्रपट तयार करत आहोत"

पणजी, 27 नोव्‍हेंबर 2021 

 

तीन  फरार गुन्हेगार आणि त्यांनी ओलीस ठेवलेले लोक यांच्यातील एका साहसी चकमकीची ही कथा आहे. डी'कोस्टा हाऊस हा गुन्हेगारी जगतावरील रहस्यमय चित्रपट असून उत्कंठा ताणून धरत तो प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवतो. गोव्यात आयोजित   इफ्फी 52 मधील गोवा विभागातील हा  चित्रपट आहे.

इफ्फी 52 दरम्यान दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांनी आज  पत्रकार परिषदेत संवाद साधला. गोवा कनेक्शनबद्दल ते म्हणाले, “गोव्याचा अर्थ चांगला सूर्यप्रकाश , बीच  आणि समुद्र असा नाही. गोव्यात अजून बरेच काही आहे; मी माझ्या चित्रपटातून हे चित्रण करण्याचा प्रयत्न करत आहे.” या पत्रकार परिषदेला  निर्माते डॉ.प्रमोद साळगावकरही  उपस्थित होते. .

या चित्रपटाचा  इफ्फी 52  मध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला. “हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही आमचा  चित्रपटाचा इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रदर्शित  करू शकलो”,अशा भावना दिग्दर्शक शिकेरकर यांनी व्यक्त केल्या.

कोकणी चित्रपट तयार करणे  म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे, कारण त्यातून कमाई होत  नाही, असे मत शिकेरकर यांनी व्यक्त केले. “आम्ही आमच्या भाषेच्या प्रेमापोटी कोकणी चित्रपट तयार करतो. कोकणी संस्कृती या चित्रपटांमधून दाखवली तरच कोकणी टिकेल आणि म्हणूनच आम्ही हे चित्रपट तयार करत आहोत. हा माझा पाचवा चित्रपट आहे आणि माझ्या एकाही निर्मात्याने या चित्रपटांतून एकही पैसा कमावलेला नाही, पण तरीही ते भाषेच्या प्रेमापोटी हे करत आहेत.”

जितेंद्र शिकेरकर यांना या क्षेत्रातील  18 वर्षांचा अनुभव आहे आणि  यापूर्वीही ते  इफ्फीमध्ये सहभागी झाले आहेत.

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1775808)
Read this release in: English , Urdu , Hindi