माहिती आणि प्रसारण मंत्रालय
52 व्या इफ्फीमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींना लघुपट निर्मितीविषयी जागतिक दृष्टिकोन मिळाला, यंदा प्रथमच ओटीटी मंचही सहभागी झाल्याबद्दल सर्वांनी दिले धन्यवाद
कलाकारांच्या स्वप्नांना पंख देऊन सत्यामध्ये उतरेपर्यंत निर्मात्याला काम करावे लागते - 52 व्या इफ्फीच्या मास्टरक्लासमध्ये गोबेलिन्सच्या शिराझ बॅजिन मुसी यांचे मनोगत
पणजी, 27 नोव्हेंबर 2021
इफ्फीच्या प्रत्येक आवृत्तीबरोबर या महोत्सवाची व्यापकता आणि खोली वाढत जात आहे. चित्रपट रसिकांना अशा महोत्सवांमुळे अनेक सदिच्छा मिळतात. या महोत्सवामध्ये यंदा प्रथमच ओटीटी मंचही सहभागी झाला. तसेच निर्मात्यांनी तयार केलेल्या लघुपटांचे किती महत्व आहे, याविषयी चित्ररसिकांना एकप्रकारचा जागतिक दृष्टिकोन मास्टरक्लासमुळे मिळाला. यंदाच्या इफ्फी मध्ये पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गोबेलिन्स इमेज संस्थेच्यावतीने नेटफ्लिक्सच्या मदतीने या मास्टरक्लासचे आयोजन केले होते. यावेळी निर्मिती विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिराझ बॅजिन मुसी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
चित्रनिर्मितीमध्ये निर्मात्याची भूमिका नेमकी कशी असते, याविषयाचा उहापोह शिराझ यांनी केला. कलाकाराची स्वप्ने प्रत्यक्षात येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागतो. एक निर्माता म्हणून सर्वात नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. काळ आणि वेळ यांचे भान ठेवून यासाठी त्याला काम करावे लागते, असेही शिराझ यांनी मास्टरक्लासमध्ये सांगितले.
दिग्गज निर्मात्यांचे काम पाहिले तर लक्षात येते की, त्यांची दूरवरच्या क्षितिजावर दृष्टी असायची, आगामी ट्रेंड कुठला असू शकतो, कशा धर्तीचा सिनेमा नजिकच्या भविष्यात चलनी नाणे ठरेल, याचा आधीच अंदाज निर्मात्याला येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्याने लघुपटाची निर्मिती का करावी? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, लघुपटांच्या निर्मिती करताना निर्मात्याना स्वतःमधल्या नव्या कलागुणांचा शोध लागत आणि निर्मात्याला अभिव्यक्त होण्याची गरजही असते.
लघुपट निर्मितीचा आणखी एक लाभ सांगताना त्या म्हणाल्या, लघुपट तयार करण्यात जोखीम कमी असते आणि दिग्दर्शकांना स्वातंत्र्य मिळते.
कल्पनेचे कथाबीज कितीही लहान असले तरी ती कल्पना निर्मात्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे, असे संागून शिराझ म्हणाल्या,‘‘ आताच्या नव्या काळातल्या निर्मात्यांना रजंक पद्धतीने कथा सांगायला आवडते. कमी खर्चात तयार झालेले लघुपट हे अगदी थोडक्यात तरीही अतिशय प्रभावीपणे कथा सांगू शकतात. त्यामुळे लघुपट हा एक चांगला मार्ग आहे.’’
‘लास्कर्स’ या अॅनिमेटेड मालिकेचे उदाहरण देऊन शिराझ म्हणाल्या, सिने उद्योगातल्या अनेक युवा चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारी ही मालिका म्हणजे यशोगाथा बनली आहे.
‘गोबेलिन्स- स्कूल ला इमेज’ ही संस्थेने 50 वर्षांपेक्षाही जास्त काळापूर्वी तयार केलेल्या चित्रफिती म्हणजे कला शाळांसाठी संदर्भांचा खजिना बनला आहे. गोबेलिन्सच्या दृष्टीने सर्जनशील उद्योगांच्या परिमाणे अतिशय वेगळी आहेत. त्यांनी या चित्रफिती मूळ स्वरूपामध्ये जतन करून ठेवल्यामुळे खरेतर धन्यवाद दिले पाहिजेत. या कलाशाळेमध्ये मूळच्या संकल्पनेपासून ते चित्रफितीच्या निर्मितीच्या सर्व टप्प्यांमध्ये आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टींच्या व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते.
इफ्फीच्या इतिहासात यंदा प्रथमच ओटीटी मंचाचा सहभाग झाला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेजॉन, सोनी यांच्यावतीने विशेष मास्टरक्लासेसचे आयोजन केले होते. कंटेट लॉन्च आणि पूर्वावलोन, क्यूरेटेड फिल्म पॅकेज स्क्रिनिंग आणि इतर कार्यक्रम विविध माध्यमातून आभासी पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775724)
Visitor Counter : 245