माहिती आणि प्रसारण मंत्रालय
52 व्या इफफीच्या भारतीय पॅनोरामा विभागातील “अभिजान’ या चित्रपटाद्वारे बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांना आदरांजली
पणजी, 27 नोव्हेंबर 2021
बंगाली चित्रपट सृष्टीतल्या सुवर्णयुगातील बिनीचे शिलेदार, सुप्रसिद्ध आणि विशेषतः शोकात्म भूमिकांसाठी नावाजले गेलेले ज्येष्ठ अभिनेते दिवंगत सौमित्र चॅटर्जी यांना 52 व्या इफफीच्या भारतीय पॅनोरामा विभागात “अभिजान( अभियान)’ या चित्रपटातून आदरांजली वाहण्यात आली आहे.
“अभिजान (अभियान किंवा मोहीम) हा चित्रपट सौमित्र चॅटर्जी यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रवासावर आधारित आहे. सौमित्र चॅटर्जी केवळ एक अभिनेते नव्हते, तर ते एक चालती-बोलती संस्थाच होते.” असे मत, या चित्रपटातील अभिनेत्री, पाओली दाम, यांनी व्यक्त केले. इफफीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सौमित्र चॅटर्जी यांच्यासोबतचा संवाद कायम आपल्या ज्ञानात भर घालणारा, आनंददायी अनुभव असे. “ते एक असे अभिनेते होते, ज्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अगदी आजच्या काळातही सगळे बंगाली कलाकार करत असतात. त्यांचे अभिनेता म्हणून कार्य, त्यांची अभिनयाची शैली येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील. त्यांच्यासोबत काही काम करण्याची संधी मला लाभली, हे माझे सौभाग्य आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.
आजच्या उदयोन्मुख अभिनेत्यांनी त्यांची मुक्त कार्यशैली, खास सर्जनशील मन आणि संवेदनशील शहाणपण, यांचा आदर्श घ्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी, सांगितले, ‘की सुरुवातीला जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवण्याचे ठरवले, त्यावेळी, सौमित्र चॅटर्जी यांनी आमचा प्रस्ताव नाकारला, मात्र नंतर अनेकवेळा विनंती केल्यावर अखेर त्यांनी संमती दिली. त्यांच्यावर चरित्रपट बनवण्याऐवजी, आम्ही त्यांनाच घेऊन, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रवास चित्रित केला.”
अभिजान
(भारतीय फीचर फिल्म- बंगाली )
दिग्दर्शकाविषयी : परमब्रत चट्टोपाध्याय हे एक अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी एकूण 87 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे . (यात मुख्यतः बंगाली आणि हिन्दी चित्रपटांचा समावेश आहे) ‘कहानी’ या (2012) गाजलेल्या हिन्दी चित्रपटांतून त्यांनी हिन्दी सिनेसृष्टीत प्रवेश केला.
चित्रपटाविषयी : डॉ संजय सेन, एक अनिवासी भारतीय कर्करोग तज्ञ आहेत. ते कोलकाता इथे येतात ते सौमित्र चॅटर्जी, या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णकाळातील अभिनेत्याच्या प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी. सुरुवातीला सौमित्र चॅटर्जी त्यांना सरळ नकार देतात. मात्र नंतर, ते त्यांच्या आयुष्याचे चित्रण करायला तयार होतात. त्यांचे जीवन, अनुभव, तत्वज्ञान आणि आयुष्यात बसलेले धक्के, संकटे या सर्वांचा हा प्रवास आहे.
निर्माते : रतनश्री निर्माण, ही नव रतन जवहार यांची संस्था आहे. तर रोडशो ही संस्था परमब्रत चट्टोपाध्याय, अरित्रा सेन आणि सुप्रियो सेन यांनी 2016 साली स्थापन केली.
कलाकार आणि तंत्रज्ञ
पटकथा : परमब्रत चट्टोपाध्याय, पद्मनाभ
प्रसिद्धी विभाग : अप्पू प्रभाकर
संकलन : सुमित चौधरी
कलाकार : सौमित्र चॅटर्जी, जिष्णू सेनगुप्ता, प्रेमब्रत सी.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775717)
Visitor Counter : 187