माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘द नाईट बिलॉन्ग्स टू लव्हर्स’ ही प्रेम आणि आसक्ती यांची गोष्ट आहे : 52व्या इफ्फी मधील वार्ताहर परिषदेत ज्युलियन हिलमोईन यांचे विधान

Posted On: 26 NOV 2021 10:40PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्‍हेंबर 2021 

 

52व्या इफ्फी मधील वार्ताहर परिषदेत ‘द नाईट बिलॉन्ग्स टू लव्हर्स’ चे   दिग्दर्शक  ज्युलियन हिलमोईन यांनी काल सांगितले, की हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि आसक्ती  यांची  अतिशय तरल व उत्कट कथा आहे.

या चित्रपटात एक उत्कट प्रेमकथा दाखवली आहे. उत्कट भावनेची तीव्रता कायम राखण्यासाठी आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण एकाच सेट वर आणि फक्त दोन कलाकारांसोबत पूर्ण केले आहे. 

या चित्रपटातील वारंवार येणारे उत्कट आणि प्रेमभावनायुक्त प्रसंगाचे औचित्य काय होते अशी विचारणा झाल्यावर ते म्हणाले,  कि चित्रपटातील प्रेमाचे आणि जवळीकीचे गांभीर्य दर्शवण्यासाठी हे प्रसंग आवश्यक असल्याचे माझ्या सर्व सहकाऱ्यांमध्ये एकमत होते.

कोणतीही कथा प्रभावीपणे  उलगडून दाखवण्यासाठी  दिग्दर्शकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असले पाहिजे , असेही  ते पुढे म्हणाले. 

इफ्फी मधील जागतिक पॅनोरमाचा एक भाग म्हणून हा चित्रपट काल प्रदर्शित करण्यात आला होता.

 

‘द नाईट बिलॉन्ग्स टू लव्हर्स’- फ्रेंच चित्रपट

(जागतिक पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित)

दिग्दर्शकाबद्दल माहिती :

ज्युलियन हिलमोईन या फ्रेंच दिग्दर्शकाचा जन्म १९७९ मध्ये झाला . चित्रपट विषयक पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘ल फेमीस ’ मधील दिग्दर्शन विभागातून २००६ साली पदवी प्राप्त केली . २००५ ते २००८ दरम्यान त्यांनी तीन लघुचित्रपट दिग्दर्शित केले. २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट  ‘ला न्यूई ऊज अमॉन्स’ दिग्दर्शित केला .

या  चित्रपटाची २०२१ च्या अथेन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड झाली होती.

निर्माता : निकोलस ब्रेव्हिए

निर्मिती व्यवस्थापन : योआन दि मोंग्रों

संपादन : सॅड्रीक ल फ्लॉक

कलाकार : लॉरा म्युलर , शेमसी  लोथ

 

* * *

Jaydevi PS/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1775602) Visitor Counter : 76


Read this release in: English , Urdu , Hindi