दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सॅटेलाईट आधारित सेवा देण्यासाठी परवाना घेण्याची दूरसंचार विभागाची स्टारलिंक इंटरनेट सेवेला सूचना


स्टारलिंककडे परवाना नसल्याचे दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण

प्रविष्टि तिथि: 26 NOV 2021 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2021

स्टारलिंक इंटरनेट सर्विसेस या आंतरजाल पुरवठा सेवेने केलेल्या जाहिरातीप्रमाणे भारतात उपग्रहाधारित आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना स्टारलिंक इंटरनेट सर्विसेसकडे नसल्याचे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.

स्टारलिंकने उपग्रहाधारित आंतरजाल सेवेच्या आगावू नोंदणी वा विक्रीस आरंभ केल्याचे निदर्शनास आले आहे. www.starlink.com या संस्थळावरून भारतीय प्रदेशातील उपग्रहाधारित सेवांसाठी नोंदणी करता येते,  असे निदर्शनास आले आहे.

भारतात उपग्रहाद्वारे आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचा परवाना घेणे आवश्यक असते. या कंपनीच्या संस्थळावरुन नोंदणी करण्यात येत असलेली आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी कोणताही परवाना वा अधिकृत मान्यता या कंपनीने मिळवलेली नसल्याचे दूरसंचार विभागाकडून सार्वजनिकरित्या स्पष्ट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भारतात आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी कंपनी नियमांची चौकटीला बाध्य असल्याने या सेवांसाठीची नोंदणी त्वरीत थांबवावी असा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.  

स्टारलिंककडे परवाना नसल्यामुळे लोकांनी स्टारलिंकने केलेल्या जाहिरातीला बळी पडू नये आणि त्यांच्याकडून पुरवण्यात येत असलेल्या सेवेसाठी नोंदणी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1775470) आगंतुक पटल : 416
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी