उपराष्ट्रपती कार्यालय
भारतीय लोकशाहीला कोणत्याही बाह्य संस्थांकडून प्रमाणपत्राची गरज नाही : उपराष्ट्रपतींचे ठाम प्रतिपादन
भारतीय नागरिक असण्यासाठी केवळ देशाच्या संविधानावर ठाम विश्वास असणे पुरेसे : एम व्यंकय्या नायडू
Posted On:
26 NOV 2021 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2021
“देशातील लोकशाही व्यवस्थेचे कार्यान्वयनच, देशात,सर्व नागरिकांना समान अधिकार आणि न्यायाची हमी देणाऱ्या संवैधानिक मूल्यांची जपणूक होते आहे की नाही, हे सिद्ध करणारे असते, त्यासाठी कोणत्याही बाह्य संस्थांच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असे ठाम आणि स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज , ‘डेमॉक्रसी, पॉलिटिक्स अँड गवर्नेंस” या शीर्षकाच्या पुस्तकाच्या हिन्दी आणि इंग्रजी आवृत्त्याचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. नेहरू स्मृति संग्रहालय आणि वाचनालयाच्या कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष,संसदीय आणि घटनात्मक विषयांचे भाष्यकार आणि ज्येष्ठ पत्रकार, डॉ ए. सूर्य प्रकाश यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
भारतीय लोकशाहीच्या कार्यपद्धती विषयी पश्चिम देश आणि अमेरिकेत काही विपरीत अहवाल आल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या लोकशाहीच्या समर्थनार्थ उपराष्ट्रपतींनी हे विधान केले. सूर्यप्रकाश यांनी अशा अहवालांचे पुराव्यानिशी खंडन केल्याबद्दल त्यांनी सूर्य प्रकाश यांचे अभिनंदन केले.
भारतीय नागरिक असण्यासाठी देशाच्या राज्यघटनेप्रती, संविधाचे उद्दिष्ट आणि तत्वज्ञानाप्रती निष्ठा बाळगणे पुरेसे आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. देशाच्या संविधानाचा उद्देश, देशातील सर्व नागरिक- जे समान आहेत, त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करणे हा आहे. “प्रत्येक भारतीय नागरिकाने, जात, पंथ, वर्ण, प्रदेश, धर्म या पलीकडे पाहत, एकत्र येण्याची गरज आहे.” असे सांगत, याच भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी गेली 30 वर्षे लेखन करणाऱ्या सूर्य प्रकाश यांचे त्यांनी अभिनंदन केले.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775454)
Visitor Counter : 197