आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 120 कोटी 27 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, 83 लाख 88 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर आता 98.33% आहे

गेल्या 24 तासात देशात 10,549 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,10,333

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.89%) गेले 12 दिवस हा दर 1% हून कमी आहे

Posted On: 26 NOV 2021 10:22AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 26 नोव्हेंबर 2021



गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 83,88,824 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 120 कोटी 27 लाखांचा (1,20,27,03,659) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,24,56,121 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या ज्या एकूण मात्रा दिल्या गेल्या आहेत त्यांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

 

HCWs

1st Dose

1,03,83,059

2nd Dose

94,47,649

 

FLWs

1st Dose

1,83,77,537

2nd Dose

1,64,07,467

 

Age Group 18-44 years

1st Dose

45,05,30,789

2nd Dose

20,77,73,074

 

Age Group 45-59 years

1st Dose

18,27,51,818

2nd Dose

11,58,74,508

 

Over 60 years

1st Dose

11,44,49,607

2nd Dose

7,67,08,151

Total

1,20,27,03,659



गेल्या 24 तासात 9,868 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,39,77,830 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.33% झाला असून मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे.




केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या आता गेले सलग 152 दिवस, 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासात, 10,549 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.




भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,10,133 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.32% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.





कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 11,81,246 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 63 कोटी 71 लाखांहून अधिक (63,71,06,009) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.89% असून गेले 12 दिवस हा दर 1%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.89% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 53 दिवस 2% हून कमी आणि गेले सलग 88 दिवस 3% हून कमी राहिला आहे.

***

ST/SC/CY
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775261) Visitor Counter : 164