आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 26 NOV 2021 9:42AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 120 कोटी 27 लाख मात्रा देण्यात आल्या


रोगमुक्ती दर सध्या 98.33% आहे; मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे


गेल्या 24 तासांत 9,868 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण कोविडमुक्त रुग्णांची संख्या वाढून ती 3,39,77,830 इतकी झाली आहे


गेल्या 24 तासात 10,549 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली


भारतात सध्या 1,10,133 कोविड सक्रीय रुग्ण


देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी असून सध्या हे प्रमाण 0.32% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे


दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या (0.89%) गेले 53 दिवस हा दर 2% हून कमी


साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या (0.89%) गेले 12 दिवस हा दर 1% हून कमी


देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 63 कोटी 71 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775235) Visitor Counter : 145