माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘बादल सरकार अँड द अल्टरनेटिव्ह थिएटर’ - 52 व्या इफ्फीमध्ये भारतीय पॅनोरमामध्ये एका आख्यायिकेची पुनर्निमिती


आजच्या समाजामधली आत्मसंतुष्टता दूर करण्यासाठी आपल्याला नाटक आणि सिनेमांची आवश्यकता - दिग्दर्शक अशोक विश्वनाथन

Posted On: 24 NOV 2021 11:20PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

सुप्रसिद्ध रंगकर्मी बादल सरकार यांच्यामध्ये  नाट्यलेखन, रंगभूमी कार्यकर्ता, संवाद लेखन, चित्रपट कलाकार, आणि तत्वज्ञानी असे अनेक वादातीत गुण होते. मात्र त्याला योग्य प्रमाणात, मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली नाही. ‘बादल सरकार अँड अल्टरनेटिव्ह थिएटर’ हा एक व्दंव्दात्मक, वादविवादात्मक अर्ध-माहितीपट आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मला मिळाली होती, या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही या दिग्गज व्यक्तीचे जीवनकार्य पुन्हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.’’ असे मनोगत  दिग्दर्शक अशोक विश्वनाथन यांनी व्यक्त केले.

गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 52 व्या इफ्फीमध्ये चित्रपट प्रदर्शनाबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमामध्ये दिग्दर्शक विश्वनाथन बोलत होते.  संपूर्ण जग एकदम जणू हिंसक आणि लढाईचे स्थान बनले आहे. प्रत्येकजण आपआपल्या कोषांमध्ये अडकून पडला असून तिथेच तो व्यग्र आहे, त्यामुळे खरे कौशल्य, ख-या बुद्धिमत्तेची ओळख पटत नाही.

‘‘आज आपण मोठ्या प्रमाणात राजकीयीकरण झालेल्या समाजामध्ये वास्तव्य करीत आहोत. त्यामुळेच तर मध्यम आणि उच्च वर्गामध्ये असलेली आत्मसंतुष्टता दूर करण्यासाठी आपल्याला रंगभूमी आणि सिनेमा यांची अतिशय आवश्यकता आहे.’’असे दिग्दर्शक विश्वनाथन यावेळी म्हणाले.

‘‘बादल सरकार म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की, त्यांनी मुख्य प्रवाहाच्या बाहेर खूप मोठे काम केले. त्यांनी कधीच रंगभूमीचा पडदा आणि वाद्यवृंद यांच्या मधल्या भागाचा विचार केला नाही. त्यामुळे माझा चित्रपट या मधल्या भागाच्याही पलिकडे जावून सैद्धांतिक प्रभाव टाकणारा आहे. जणू तो आपल्यामध्येच घडतोय. एका नाटकामध्ये फक्त कलाकार प्रेक्षकांसमोर बोलत असतात. मात्र इथे ते प्रेक्षकांशी संवाद साधतात आणि त्यांना स्पर्श करतात, त्यांना हा चित्रपट अनुभवता येईल, ’’ असे यावेळी दिग्दर्शक विश्वनाथन यांनी सांगितले.

बादल सरकार यांनी सिनेसृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाविषयी अधिक बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ते काही फक्त बंगाली नाटयलेखक नव्हते. त्यांचे प्रमुख काम पुण्याच्या एफटीआयआयमध्ये झाले. इथे ते शिकवत होते. अमोल पालेकर यांच्यासारख्या लोकांना बादल सरकार यांचा चांगला परिचय होता.

विश्वनाथन म्हणाले, त्यांनी जागतिक रंगभूमीविषयी ज्या गोष्टी आत्तापर्यंत ज्ञात नव्हत्या, त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटामध्ये मी त्यांचे फक्त कौतुक केले आहे, असे नाही तर, त्यांच्यावर टीका केलेलीही पहायला मिळेल.

या चित्रपटाची कल्पना कशी सूचली, या प्रश्नावर उत्तर देताना विश्वनाथन म्हणाले, ‘‘एफटीआयआयमधले बादल सरकार आणि इतरांबरोबर झालेल्या माझ्या संवादाच्या आधारे मला ही कल्पना खूप पूर्वीच सूचली होती. परंतु मला पूर्व विभागीय परिषद, संस्कृती मंत्रालय यांच्याकडून मदत मिळाल्यानंतरच हा चित्रपट पूर्ण होवू शकला.

बादल सरकार अँड द अल्टरनेटिव्ह थिएटर

(भारतीय पॅनोरमा कथा बाह्य  चित्रपट विभाग)

दिग्दर्शकाविषयी -

अशोक विश्वनाथन हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आहेत. रंगभूमीवर काम करणारे व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी एफटीआयआयमधून पदवी घेतली असून कोलकात्याच्या एसआरएफटीआयमध्ये ते प्राध्यापक आहेत. विश्वनाथन यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी 40 नाटके आणि 11 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

निर्माता -

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्र. भारताच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे काम करतो.

चित्रपटाविषयी -

प्रसिद्ध नाटककार आणि नाटयदिग्दर्शक बादल सरकार यांच्या कार्याचे मूल्यमापन आणि समीक्षा करणारा हा चित्रपट  आहे. मध्यवर्ती संकल्पना म्हणून त्यांचा प्रवास वापरून, त्याला असलेली जागतिक संदर्भाचा वैकल्पिक रंगमंचाची प्रासंगिकता तसेच प्रभाव यांचा शोध यामध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये पर्यायी रंगभूमीचा सिद्धांत आणि तालमी यांच्याविषयी तज्ञांमधील वादविवादाचेही दर्शन घडते. एका विशिष्ट  स्तरावर हा वाद संपतो कारण यामधली महान व्यक्ती सर्जनशीलतेचा ध्यास लागल्यामुळे गायब होते. त्यामुळे आपल्याला त्याच्या महत्वावर चर्चा करण्याची वेळ येते.

भूमिका आणि टीम

पटकथा- अशोक विश्वनाथन

डीओपी - सनातनू बॅनर्जी

संपादन - सौनक रॉय

भूमिका - बादल सरकार, पंकज मुन्शी, कमल रॉय.


* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775016) Visitor Counter : 196


Read this release in: Urdu , English , Hindi