रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज दुसऱ्या जागतिक रसायने आणि पेट्रोकेमिकल्स निर्मिती केंद्राचे (GCPMH) उद्‌घाटन केले

Posted On: 25 NOV 2021 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

"केंद्र सरकारचे कठोर परिश्रम आणि चिकाटी भारताचे जागतिक रासायनिक आणि पेट्रो-केमिकल निर्मिती केंद्रात परिवर्तन सुनिश्चित करेल." आज नवी दिल्ली येथे दुसऱ्या जागतिक रसायने आणि पेट्रोकेमिकल्स निर्मिती केंद्राच्या (GCPMH) उद्घाटन सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. केंद्रीय रसायने आणि खते आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा, आणि तामिळनाडूचे उद्योग मंत्र,थिरु थंगम थेन्नारसू यावेळी उपस्थित होते.

डॉ.मांडविया म्हणाले की, केंद्र सरकारने पीएलआय योजना, व्यवसाय सुलभता , कॉर्पोरेट कर प्रणालीत सुधारणा, एमएसएमई क्षेत्राला पाठिंबा यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमुळे भारत उद्योगासाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. देशात संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठी हितधारकांनी एकत्र येणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, सरकार भारतीय वैज्ञानिकांचे म्हणणे ऐकून त्यांना मदत करत आहे आणि त्यांना लसीच्या जलद संशोधनासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून दिले आहे ज्याचा आज आपल्याला फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे, पीएलआय योजना देशांतर्गत उद्योगांना त्यांचे उत्पादन वाढवण्यात आणि जागतिक ब्रँड्सना आकर्षित करण्यात मदत करत आहे; त्यामुळे देशातील निर्मिती अधिक आकर्षक बनली आहे.

हा कार्यक्रम रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाने फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) सह संयुक्तपणे फिजिटल स्वरूपात (प्रत्यक्ष आणि डिजिटल) आयोजित करण्यात आला.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1775011) Visitor Counter : 44


Read this release in: Telugu , English , Hindi