माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

‘राज कपूर : द मास्टर अ‍ॅट वर्क’ हे पुस्तक म्हणजे शोमॅन राज कपूर यांच्या विषयी नव्हे तर उत्कट व्यावसायिक राज कपूर यांचे दर्शन घडवणारे : 52 व्या इफ्फी मध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते राहुल रवैल यांचे संवाद सत्रात प्रतिपादन


राज कपूर हे जगातले सर्वोत्कृष्ट गुरु होते, चित्रपट निर्मितीची शिकण्याची अनावर ओढ असणाऱ्या लोकांना हे पुस्तक मी समर्पित करतो

पणजी, 24 नोव्‍हेंबर 2021 

 

‘राज कपूर : द मास्टर अ‍ॅट वर्क’ हे पुस्तक म्हणजे शोमॅन राज कपूर यांच्या विषयी नव्हे तर असोशीने काम करणारे आणि व्यावसायिक राज कपूर यांच्या विषयी आहे.  ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि या पुस्तकाचे लेखक राहुल रवैल यांनी 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान 24 नोव्हेंबर 2021 ला या पुस्तकाच्या  संवाद सत्रा दरम्यान हे प्रतिपादन केले. गोव्यात 20-28 नोव्हेंबर 2021 या काळात हा चित्रपट महोत्सव होत आहे. या संवाद सत्राला राज कपूर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते रणधीर कपूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी राहुल रवैल आणि रणधीर कपूर यांनी संयुक्तपणे या पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण केले.

सिनेसृष्टीतील या नामवंताच्या चरित्राचे 14 डिसेंबर 2021 ला, राज कपूर यांच्या 97 व्या जयंती दिनी प्रकाशन होणार आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना हे चरित्र समर्पित करण्यात आले आहे.

हे पुस्तक आपल्यासाठी खास कसे आहे हे रणधीर कपूर यांनी प्रेक्षकांना सांगितले. ‘माझे वडील हे उत्कृष्ट कथाकार होते. त्यांच्या योगदानाविषयी अनेक पुस्तके असली तरी राहुल रवैल यांनी लिहिलेले पुस्तक आपल्यासाठी विशेष महत्वाचे आहे कारण त्यांनी माझ्या वडिलांसमवेत हा समृध्द इतिहास अनुभवला आहे’ असे रणधीर कपूर यांनी सांगितले. हे पुस्तक उत्तम झाल्याचे ते म्हणाले.

या दिग्गज कलाकाराच्या चित्रपट निर्मिती शैलीच्या सर्व पैलूविषयी हे पुस्तक वाचकांना परिचय करून देते. त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्या बरोबरच राज कपूर यांच्या आतापर्यंत परिचित नसलेल्या पैलूंची ओळखही हे पुस्तक करून देते असे रवैल म्हणाले. ‘मी आज जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच आहे. राज कपूर यांना असलेली विनोदाची जाण, अंतर्दृष्टी, चित्रपटाच्या चमू समवेत त्यांचे असलेले नाते, खवय्ये आणि अर्थातच रशियाविषयीचे त्यांचे प्रेम यांचे वर्णन करणारे अनेक किस्से या पुस्तकात आहेत. 

चित्रपट निर्मितीविषयी ज्ञानाची तहान असलेल्या लोकांसाठी आपण हे पुस्तक समर्पित करत असल्याचे,  या महान चित्रपट निर्मात्याशी जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या रवैल यांनी सांगितले. ‘राज कपूर हे जगातले सर्वोत्कृष्ट गुरु होते. त्यांच्याकडून शिकलेल्या, मुग्ध करणाऱ्या अनेक  बाबी मी कधीच विसरू शकणार नाही. राज कपूर यांच्या चित्रपट निर्मितीची शैली तपशीलवार उलगडून दाखवणारे दहा अध्याय या पुस्तकात आहेत.   

आपण आपल्या अनेक चित्रपटात राज कपूर यांच्या शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला हे मान्य करण्यात आपल्याला कमीपणा वाटत नसल्याचे लव्ह स्टोरी, बेताब, अर्जुन यासारख्या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक असणाऱ्या रवैल यांनी सांगितले.

पुस्तकाबाबत आपण रणधीर कपूर, दिवंगत ऋषी कपूर आणि कृष्णा कपूर यांच्याशी चर्चा केली. राज जी यांनी कसे काम केले हे जाणणारी व्यक्तीच त्यांच्यावर पुस्तक लिहू शकते असे सांगत त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे रवैल म्हणाले.

ऋषी कपूर यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा रवैल यांचा विचार आहे का हे जाणून घेण्यासाठी चित्रपट क्षेत्रातले प्रतिनिधी उत्सुक होते. कपूर घराण्याविषयीच्या पुस्तकाच्या धर्तीवर लिहीण्यासाठी प्रकाशकांनी सुचवल्याचे रवैल यांनी सांगितले.

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774931) Visitor Counter : 276


Read this release in: Punjabi , Urdu , English , Hindi