माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

लघुपट हे चित्रपट दिग्दर्शकांच्या व्यावसायिक प्रवासाचा एक महत्वाचा भाग असतात: 52 व्या इफ्फीमध्ये सेसिल ब्लाँडेल यांचा ‘व्हाय मेक शॉर्ट व्हिडिओज्’ विषयावर मास्टरक्लास

पणजी, 24 नोव्हेंबर 2021

 

‘‘गोबेलिन्स गेल्या 45 वर्षांपासून आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून लघुपट बनविण्यास सांगते. हे चित्रपट आमच्यासाठी एकप्रकारची संपत्ती आहे, असे गोबेलिन्स स्कूल ऑफ इमेजच्या सेसिल ब्लॉंडेल  यांनी आज सांगितले. त्या गोव्यात सुरू असलेल्या 52 व्या इफ्फीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘लघुपट का बनवावेत’  या  विषयावरच्या आभासी मास्टरक्लासमध्ये बोलत होत्या.  

लघुपटाचे महत्व विशद करताना सेसिल ब्लॉंडेल  म्हणाल्या, ‘‘ अमेरिकेत 59 मिनिटांपेक्षा कमी आणि यूके मध्ये 50 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या चित्रपटांना लघुपट मानले जाते. प्रेक्षकांकडून वाढती मागणी येत असल्यामुळे गेल्या काही वर्षात लघुपटांच्या निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. ’’ 

‘‘लोक प्रवास करताना अथवा त्यांच्या ज्यावेळी सवड असेल त्यावेळी आपल्या फोनवरही लघुपट पाहू शकतात. या वस्तुस्थितीमुळेही लोकांमध्ये लघुपटांविषयी आकर्षण वाढले आहे.’’ असे ब्लाँडेल यांनी नमूद केले. 

आता चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या मोठ्या मंडळींच्या दृष्टीने लघुपट विभाग किती महत्वाचा आहे आणि त्याकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, यावर भर देताना ब्लाँडेल  यांनी माहिती दिली की, आता पिक्सरने आपला लघुपट विभाग सुरू केला आहे आणि ते या विभागाला व्यावसायिक विभाग म्हणून महत्व देत आहेत.’’ 

लघुपट आकर्षक का असतात, याविषयीच्या कारणांची चर्चा करताना ब्लाँडेल म्हणाल्या, एक तर त्या कमी खर्चात बनतात त्यामुळे जोखीम कमी असते. त्याचबरोबर लघुपट तुम्ही एकट्यानेच बनविण्याची स्वायत्तताही मिळते.’’ 

‘‘लहान व्हिडिओचे तुम्ही केलेले काम स्टुडिओंमध्ये दाखवू शकता, त्यामुळे प्रदर्शनासाठी इतर अडथळ्यांना पार करणे सहज शक्य असते, ’’असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

‘‘चित्रपट निर्मितीच्या कलेमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी लघुपट तयार करणे हे एक उत्तम साधन आहे. याविषयी अधिक स्पष्ट करताना ब्लाँडेल म्हणाल्या, ‘‘ सिनेमाविषयी झटपट शिकण्याचा हा एक मार्ग आहे. ज्या क्षेत्रामधल्या तणावाच्या वातावरणामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, त्याविषयीची विविध कौशल्ये  आपल्याला शिकता येतात तसेच त्यांचे हस्तांतरण करण्यायोग्य प्रकारामध्येही करता येते.

एका पाहणी अभ्यासाचा आधार देवून ब्लाँडेल यांनी सांगितले की, 100 चित्रपट दिग्दर्शकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक तृतीयांश जणांनी आपल्या व्यावसायिक प्रवासामध्ये लघुपटाचा महत्वाचा भाग आहे, असा उल्लेख केला आहे. 

फोन आणि इंटरनेट या माध्यमांमुळे लघुपट अगदी सहजपणे जगाच्या सीमा ओलांडू शकतात आणि विशेष म्हणजे लघुपट उत्पन्नाचे साधनही बनू शकते, असे प्राध्यापक ब्लाँडेल यांनी यावेळी सांगितले. 

फ्रान्समध्ये क्लेर्मोंट फेरांड लघुपट महोत्सवाला अतिशय महत्व असल्याचे प्राध्यापक ब्लाँडेल यांनी सांगितले. कान्सच्या खालोखाल जगातला दुसरा सर्वात प्रतिष्ठित असा हा लघुपट महोत्सव आहे. जगातल्या लघुपटांसाठी सर्वात महत्वाचा तो मानला जातो. या महोत्सवात जगातल्या 7000 पेक्षाही जास्त लघुपटांचे प्रदर्शन केले गेले आहे. 

ब्लाँडेल यांनी कलेचा इतिहास या विषयाचा अभ्यास आणि काम केले आहे. 1989 ते 1995 या काळात त्या सांस्कृतिक इतिहास या विषयाच्या सहयोगी संशोधक आणि व्याख्यात्या होत्या. त्यांनी पॅरिसमधल्या  ला सॉरबोन आणि सायन्स पो या संस्थांमध्ये शिकवले आहे. 2012 पासून त्या गोबेलिन्स येथे आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख म्हणून काम पाहतात. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम , उन्हाळी शाळा आणि कॅरेक्टर अॅनिमेशनमधील मास्टर ऑफ आर्टसच्या  त्या प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. 

* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1774903) Visitor Counter : 296


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi