वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जागतिक वस्त्रोद्योगासाठी पसंतीचा उत्पादक भागीदार होण्यासाठी भारत एक्स्पो 2020 मध्ये नाविन्यपूर्ण भागीदारी शोधणार

Posted On: 24 NOV 2021 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

दुबई येथे आयोजित एक्स्पो 2020 मधील भारताच्या शामियान्यात शुक्रवार, 26 नोव्हेंबर, 2021 पासून सुरू होत असलेल्या वस्त्रोद्योग सप्ताहा दरम्यान भारत जागतिक वस्त्रोद्योगासाठी पसंतीचा उत्पादक भागीदार बनण्यासाठी प्रयत्न करेल.वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री, श्रीमती. दर्शना व्ही जरदोश ‘वस्त्रोद्योग सप्ताहा’चे आभासी माध्यमातून उद्घाटन करतील.  आगामी वस्त्रोद्योग सप्ताहाविषयी बोलतांना (२६ नोव्हें-२ डिसेंबर), श्रीमती. जरदोश म्हणाल्या की, भारतीय वस्त्रोद्योग हा जगप्रसिद्ध आहे कारण तो केवळ देशाच्या तेजस्वी भूतकाळाचे प्रतिनिधित्व करत नाही तर आधुनिक काळाच्या गरजांशी सुसंगत आहे.भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्र आणि तयार वस्त्र निर्यात करणारा देश आहे आणि भारताने जागतिक उत्पादन केंद्र बनण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींवर लक्ष केंद्रित केले असून जागतिक गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी अपार संधीचे भारत प्रतिनिधित्व करतो .

भारताच्या शामियान्यात ‘वस्त्रोद्योग सप्ताहा’ दरम्यान उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलाय ) योजनेसह वस्त्रोद्योगासाठी भारत एक उत्पादक आणि गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून गोलमेज  चर्चेसहभागी अनेक उपक्रम पाहायला मिळतील.

विशेष म्हणजे, वस्त्र, कपडे आणि सहाय्यक घटकांसाठी भारत सर्वोत्तम उत्पादन ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखला जातो.भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा अंदाजे 2.3% इतका आहे आणि वस्त्रोद्योग हा सर्वात मोठा नियोक्ता असून हा उद्योग सुमारे 45 दशलक्ष कामगारांना रोजगार देतो.

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1774845) Visitor Counter : 194


Read this release in: English , Hindi , Punjabi