सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे उद्यापासून राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर; जयपूरमधील सांगानेर येथील झालना डोंगरी आणि कुमारप्पा राष्ट्रीय हँडमेड पेपर संस्था येथे केव्हीआयसी दुकानाचा आढावा घेणार
Posted On:
24 NOV 2021 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021
केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. जयपूरमधील सांगानेर येथील झालना डोंगरी आणि कुमारप्पा राष्ट्रीय हँडमेड पेपर संस्था येथे केव्हीआयसी दुकानाचा आढावा घेतील. तसेच युथ आयकॉन पुरस्कार 2021 देखील प्रदान करतील. 26 नोव्हेंबर 2021 रोजी जयपूर येथे ते पत्रकारांना संबोधित करतील.
कुमारप्पा राष्ट्रीय हँडमेड पेपर संस्था ही केव्हीआयसीची एक आघाडीची संस्था आहे जी 1991 मध्ये यूएनडीपीच्या सहाय्याने स्थापन करण्यात आली होती. या संस्थेने स्थानिक हस्तनिर्मित पेपर कारखान्यांना संशोधन आणि विकास संबंधी सेवा , सल्लामसलत आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची संस्थेला मान्यता आहे. उद्योगाच्या आवश्यकतेनुसार ती आठ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत, संस्थेने 2018 मध्ये प्लास्टिक कचऱ्यापासून हाताने कॅरीबॅग बनवण्याचे आणखी एक नवीन संशोधन केले. बाजारासाठी या नाविन्यपूर्ण कॅरीबॅग तयार करण्यासाठी 20 टक्के कच्चा कागद टाकाऊ प्लास्टिकमध्ये मिसळला जातो. संस्थेच्या निसर्ग प्रकल्पातील प्लॅस्टिक पुनर्वापर अंतर्गत. अंदाजे 35 टन प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून सुमारे 40 लाख कॅरीबॅग तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे 1.4 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
संस्थेने पर्यावरण-स्नेही खादी नैसर्गिक रंगही विकसित केला आहे जो या वर्षी 12 जानेवारी रोजी बाजारात आणण्यात आला. या रंगात 25 ते 30 टक्के शेण वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ते बुरशीरहित आणि जीवाणूरोधक बनते. खादी रंग डिस्टेंपर आणि प्लॅस्टिक इमल्शन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि यासारख्या इतर उत्पादनांपेक्षा स्वस्त आहे. संस्थेने व्यावसायिक तत्त्वावर खादी रंगाचे उत्पादन करण्याच्या क्षेत्रात पाच दिवसांचे प्रशिक्षण सुरू केले असून, आतापर्यंत सुमारे 900 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेने सुमारे 20,000 लिटर खादी नैसर्गिक रंगाचे उत्पादन केले आहे, तर राष्ट्रीय स्तरावर विक्रीसाठी 16 डीलर्सची निवड करण्यात आली आहे.
संशोधन आणि विकास उपक्रम सुरू ठेवत, संस्थेने अलीकडेच शेणापासून काढलेल्या जिवाणू रोधक घटकांसह कापड विकसित केले आहे, जे लवकरच बाजारात आणले जाईल.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774761)
Visitor Counter : 213