माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मला वाटते की, "सरदार उधम" पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी जालियनवाला बागच्या स्मृती सोबत घेऊन जाव्यात: : इफ्फी 52 मास्टरक्लास मध्ये दिग्दर्शक शूजीत सरकार
''सरदार उधम'' सारखे चित्रपट बनवताना मी प्रसिद्धीचा विचार करत नाही
पणजी, 23 नोव्हेंबर 2021
1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा तुमच्या हृदयावर झालेला वेदनादायी आघात ,तुमच्या अस्तित्वाच्या खोलवर जाऊन तुमच्या आयुष्यासोबत घेऊन जाण्याच्या कल्पनेला काय म्हणाल? होय, सरदार उधम हा त्यांचा पहिला चरित्रपट साकारताना शुजित सरकार यांच्या मनात नेमके हेच होते.
हे आम्हाला कसे माहित आहे ते आम्हाला विचारा. यासाठी आज आयोजित केलेल्या तज्ज्ञ दिग्दर्शकाच्या "चित्रपट यशस्वी करणे आणि सरदार उधम संदर्भात कथाकथन " या विषयावरील इफ्फी 52 मधील मास्टरक्लासला धन्यवाद. प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन उपस्थित असलेल्या चित्रपटाशी संबंधित प्रतिनिधींना ज्या दिग्दर्शकाने वैविध्यपूर्ण चित्रपट तयार केले त्या दिग्दर्शकाचे अनुभव आणि प्रज्ञावंत दिग्दर्शकाला ऐकण्याची अनमोल संधी मिळाली.
सरदार उधम हा दिग्दर्शकाचा पहिलाच चरित्रपट आहे आणि तो अमृतसरमधील 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी लंडनमध्ये मायकेल ओ'डवायरची हत्या करणाऱ्या .पंजाबमधील स्वातंत्र्यसैनिक उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे.
चित्रपटाचे निर्माते रॉनी लाहिरी देखील या सत्रात सहभागी झाले आणि त्यांनी त्यांची चित्रपटाप्रती असलेली सूक्ष्मदृष्टी सिने रसिकांना सांगितली.
तज्ज्ञ वर्गात मार्गदर्शन करत असलेल्या दिग्दर्शकाने सरदारला पडद्यावर जिवंत कसे केले? या शूर स्वातंत्र्यसैनिकाचा मनाचा कल प्रतिबिंबित करण्यासाठी चित्रपटात अत्यंत शांततेचा वापर करण्यात आला आहे, असे सरकार म्हणाले. “सरदार उधम हे एक अंतर्कलह असलेले व्यक्तीमत्व आहे आणि आम्ही बहुतेक ठिकाणी संगीताचा वापर करून त्यांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला. शांततेशी जुळेल अशाप्रकारचे संगीत आपण तयार करूया,असे मी संगीत दिग्दर्शक शंतनू मोईत्रा यांना सांगितले.”
संगीताचा सर्जनशील वापर करून चित्रणाची क्रमाक्रमाने गुंफण करून चित्रपटाच्या चमूने त्या शांततेचा सुप्त आवाज निर्माण केला आणि त्याची दृश्यांसोबत सहजतेने सांगड घातली, अशाप्रकारे ही प्रक्रिया दिग्दर्शकाने समजावून सांगितली.
उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांना दिग्दर्शकाच्या दृष्टीची झलक दाखवत सरकार म्हणाले: “सरदार उधम सारखे चित्रपट बनवताना मी प्रसिद्धीचा विचार न करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.जेव्हा मी चित्रपट बनवतो तेव्हा मी प्रथम प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून विचार करतो.
प्रसिद्धी किंवा प्रशंसेसाठी नाही, असे सरकार म्हणाले. “आम्ही कल्पना आणि विचारधारेवर आधारित चित्रपट तयार करण्यावर विश्वास ठेवतो. प्रसिद्धी किंवा पुरस्कारांसाठी नाही तर लोक ते चित्रपट पाहत आहेत - हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”
विकी डोनर, पिकू आणि ऑक्टोबर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकाला सरदार उधमचा हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण संवाद ‘कोई जिंदा है’ चे महत्त्व विचारण्यात आले.“हा फक्त संवाद नाही. हा संवाद वेगवेगळ्या पद्धतीने उलगडता येऊ शकतो, हा संवाद हा माझा प्रश्न आहे, जो प्रेक्षकांच्या सामूहिक विवेकबुद्धीला उद्देशून आहे, प्रेक्षकांना अंतर्बाह्य हलवून सोडण्याबाबतचा.”
इतिहासाचे चित्रण करणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित करताना सरकार म्हणाले ''आपल्याकडून पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्याच्या अनुषंगाने इतिहासाचे अचूक चित्रण करणे फार महत्वाचे आहे.”
याशिवाय, जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलतो तेव्हा आपण वीरतेबद्दल बोलत असतो. वीरता म्हणजे गप्प राहण्याच्या विरुद्ध योग्य ते बोलणे होय”.
उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांसाठी त्याच्याकडे काही संदेश आहे का? या प्रश्नावर दिग्दर्शकाने आवाहान केले की, “तरुण दिग्दर्शकांनी त्यांच्या अंतरात्म्याला विचारायला हवे की त्यांना चित्रपट का बनवायचा आहे”
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774488)
Visitor Counter : 225