संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-इंडोनेशिया संयुक्त लष्करी सरावाच्या 37व्या सत्राचे आयोजन

Posted On: 23 NOV 2021 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

भारतीय नौदलाची खंजर ही युद्धनौका, स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र कॉर्वेट, आणि डॉनिअर सागरी गस्ती विमान व इंडोनेशियन केआरआय सुलतान थहा सैफुद्दीन (376), कपितान पातिमुरा क्लास कार्वेट यांच्या समवेत संयुक्त गस्त (CORPAT) सराव 23 ते 24 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुरू आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्या या संयुक्त गस्त सरावात दोन्ही देशांच्या सागरी सीमा गस्ती पथकातील विमानांचा सहभाग आहे. कोविड महामारी काळातील हा संयुक्त सराव म्हणजे संपर्कविहीन, फक्त सागरी सराव असेल. त्याद्वारे भारत व इंडोनेशिया या मित्र राष्ट्रांमधील परस्पर विश्वास, समन्वय आणि सहकार्य अधोरेखित होईल.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774422) Visitor Counter : 291


Read this release in: English , Urdu , Hindi