रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्या जम्मू येथे एकूण 11 ,721 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या 257 किलोमीटर एकूण लांबी असलेल्या 25 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन
Posted On:
23 NOV 2021 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या जम्मू येथे 25 राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. एकूण 257 किलोमीटर लांबीचे रस्ते असणाऱ्या या प्रकल्पांत 11,721 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे
या प्रकल्पांमुळे कोणत्याही ऋतूत जम्मू आणि कश्मीर खोऱ्याशी संपर्क कायम राखता येऊन शकेल.
संरक्षण दलांच्या त्वरित हालचालींसाठी त्याच प्रमाणे या भागातील कृषी ,औद्योगिक आणि सामाजिक तसेच आर्थिक विकासासाठी या प्रकल्पांना धोरणात्मक महत्त्व आहे.
या प्रकल्पामुळे विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यालयांना जोडणारे मुख्य रस्ते जोडले जाऊ शकतील आणि त्यामुळे रोजगार तसेच स्वयंरोजगारांच्या संधींमध्ये वाढ होईल.
G.Chippalkatti /V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774421)