माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“अनबॅलन्स्ड”: कोविड-19 संकटात आनंदमय वातावरण तयार करण्यासाठी एका व्यक्तीचा बौद्धिक शोध, 52 व्या इफ्फीमधील नाट्यमयतेने परिपूर्ण चित्रपट
मी सर्वसाधारणपणे नाट्यमय शेवट करण्याचे टाळतो, मात्र “अनबॅलन्स्ड” वेगळा असावा असा निर्णय मी घेतला: दिग्दर्शक जुआन बलदना
पणजी, 23 नोव्हेंबर 2021
“जेव्हा कोट्यवधी लोकांना काहीच पर्याय नाही, अशा परिस्थितीत हे सगळं बदलायला मी एकच करू शकतो आणि ते म्हणजे, मी लिहित असेले पुस्तक.” होय, एका मध्यमवयीन वकिलाची, भयानक महामारीच्या परिस्थितीत, प्रचंड कल्पनाशक्ती वापरून जग बदलण्याची शोध यात्रा हा 52 व्या इफ्फीमधल्या ‘अनबॅलन्स्ड’ या चित्रपटाचा विषय आहे. अर्जेंटिनाचे चित्रपट निर्माते जुआन बलदाना यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट रोडोची- ज्याला, सामाजिक कार्यकर्ता आणि फार पूर्वी विस्मरणात गेलेला सैद्धांतिक अर्थशास्त्रज्ञ जर्मन - आर्जेन्टीनियन व्यापारी सिल्वीओ गेसेल विषयी पुस्तक लिहिण्याचे वेड लागले असते- गोष्ट आहे. हा चित्रपट कोविडोत्तर काळावर आधारित मोजक्या इफ्फी चित्रपटांपैकी आहे आणि जागतिक पॅनोरामा विभागात दाखविला जात आहे.
या चित्रपटाच्या प्रेरणेविषयी बोलताना, दिग्दर्शक बलदाना म्हणाले, “मला महामारी पूर्वीचं आणि नंतरचं जग चित्रित करायचं होतं, यातूनच अनबॅलन्स्ड तयार झाला.” आज 23 नोव्हेंबर 2021 रोजी 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. चित्रपटाचे निर्माते डिएगो लॉंबर्डी हे देखील पत्रकार परिषदेत सहभागी झाले आणि प्रतिनिधींना आपल्या अनुभवाबद्दल सांगितले.
दिग्दर्शक आणि निर्माते, दोघांनीही, कोविडोत्तर काळात, सरकारने अनेक निर्बंध घातले असताना हा चित्रपट बनवतांना आलेल्या आर्थिक आणि इतर आव्हानांबद्दल माहिती दिली. लॉंबर्डी यांनी आर्थिक मदत मिळवताना आलेल्या अडचणींबद्दल आणि चित्रिकरणा दरम्यान सरकारी व्यवस्था आणि स्थानिक लोकांच्या टोकाच्या विरोधाबद्दल सांगितले.
या चित्रपटाचा आशियातील प्रीमियर काल इफ्फीमध्ये झाला. या चित्रपटात रोडोच्या बौद्धिक आणि अत्यंत यातनाकारक संघर्षाची कहाणी आहे. त्याचे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे, सिल्वीओ गेसेल, या महान जर्मन विचारवंतावर, ज्याला नवीन चलन बनवायचे होते, पुस्तक लिहून जगासाठी एक पर्यायी भविष्य निर्माण करणे हे आहे. गेसेलला, असे अनोखे चलन निर्माण करायचे होते, जे ‘बटाट्या प्रमाणे सडेल’ आणि ‘लोखंडाप्रमाणे गंजेल’, साठवणूक केल्यावर त्याची किंमत कमी होईल. असे झाल्यास कुणीही असे पैसे साठवून ठेवणार नाही, ज्यांचा उपयोग फक्त “इन्स्ट्रुमेन्ट ऑफ एक्सचेज” म्हणून असेल, इतर कुठलाही नाही.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774401)
Visitor Counter : 259