माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'लीडर' या चित्रपटात पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचे चित्रण करण्याचा प्रयत्न - चित्रपट निर्माते कोरेक बोजनोस्की
आधुनिक काळ स्त्री आणि पुरुष यांच्यातील नाते कसे बदलत आहे याचे प्रतिबिंब 'लीडर' मधून दिसते
पणजी, 23 नोव्हेंबर 2021
“आधुनिक काळ स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध सर्वसाधारणपणे कसे बदलू शकतो हे दाखविण्याचा एक प्रयत्न,'लीडर' हा चित्रपट आहे. यात मुख्यत्वे केवळ पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे ,” असे चित्रपटाचे निर्माते कोरेक बोजनोस्की यांनी आज गोव्यातील 52 व्या इफ्फीदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 'लीडर', हा पोलिश चित्रपट असून बोजनोस्की निर्मित हा पहिलाच चित्रपट आहे. जेगोश हार्टफिल या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत.
ब्लॅक कॉमेडीच्या शैलीतील या गतिमान चित्रपटाच्या कल्पनेवर प्रकाश टाकताना बोजनोस्की यांनी सांगितले की, लोक लबाडीने जगात स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी इतरांचा वापर कसा करतात हे चित्रित करण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो.
या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर इफ्फी 52 मध्ये झाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या प्रतिष्ठेच्या 'सुवर्णमयुर' पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीमध्ये इतर 14 चित्रपटांसह या चित्रपटाचा समावेश आहे.
कॅटिया आणि इगोर प्रिविझिएन्सव या भावंडांनी दिग्दर्शित केलेला, 'लीडर ' हा चित्रपट वैयक्तिक प्रशिक्षणाच्या यंत्रणेबद्दल विपर्यस्त मार्गाने भाष्य करतो आणि अशा जगाचे चित्रण करतो जिथे सर्वाधिक तर्कसंगत व्यक्ती वेड्यात काढल्या जाऊ शकतात; तर खरोखर वेड्या व्यक्ती स्थिती हाताळताना अधिकारपदाचा रुबाब गाजवताना दिसतात.
'लीडर' चा प्रवास 2017 मध्ये एक लघुपट म्हणून सुरू झाला. मात्र महोत्सवांमध्ये चित्रपटाला मिळालेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेऊन पूर्ण लांबीचा चित्रपट केला,जो इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे, असे बोजनोस्की यांनी सांगितले.
लीडर ही पीओत्रेक या दयाळू आणि लाजाळू मुलाची कथा आहे, जो साधे जीवन जगत असतो. अधिकाधिक मिळवण्याच्या सांसारिक दबावाखाली तो येतो. ज्यांच्यावर आपले प्रेम आहे प्रेम करतो अशा माणसांसाठी स्वत:ला बदलण्याचा निश्चय करतो. याच दरम्यान योगायोगाने त्याची गाठ 'लीडर' शी पडते. 'लीडर' हि अत्यंत गूढ व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहे. मग नायक स्त्रियांकडून पीडित वेगवेगळ्या परिस्थितीतील इतर पुरुषांना भेटतो जे सर्वच 'लीडर'च्या भावनिक चलाखीचे शिकार होतात.
* * *
Jaydevi PS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774347)
Visitor Counter : 385