पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ओएनजीसीचा मुंबई हाय येथील तेल प्रकल्प खासगी क्षेत्राकडे देण्याच्या तेल मंत्रालयाच्या प्रस्तावाबाबत माध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तांसंदर्भात स्पष्टीकरण
Posted On:
22 NOV 2021 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021
ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या मुंबई हाय येथील प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिला आहे अशा आशयाचे वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, ओएनजीसी ने 29 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत उदयपुर येथे अंतर्गत धोरणासंबंधी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत, येत्या 25 वर्षांतील उर्जाविषयक चित्र स्पष्ट करणारी योजना, अधिकाधिक क्षेत्रांमध्ये तेलाचा शोध घेऊन 15 वर्षांसाठीची तेल उत्खनन योजना महामंडळाच्या महत्त्वाच्य क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या शक्यतांसह अधिक प्रमाणात तेल मिळवण्यासह तंत्रज्ञानाच्या जास्त वापराबाबत चर्चा करून सूचना मांडण्यात आल्या.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये असा निर्णय घेतला कि सरकारी तेल कंपन्यांना त्यांच्या अधिक वापराच्या आणि जुन्या क्षेत्रांमधील तेल उत्पादन वाढविण्यासाठी फार्म आउट आणि संयुक्त प्रकल्पांसह क्षेत्र विशिष्ट प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
तेल आणि वायूचे देशांतर्गत उत्पादन गुणोत्तराच्या पटीत वाढायला हवे यावर सरकार ठाम आहे. ओएनजीसी या आघाडीच्या संस्थेला महत्त्वाची भूमिका निभावावी लागेल.एकीकडे, तेल काढण्यासाठी देशामधील नव्या तेल क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी शोध क्षेत्राची व्याप्ती वाढवावी लागेल. दुसरीकडे, जेथे आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे शक्य आहे तेथे तशी मदत घेऊन, अधिक तेल उत्पादक विहिरी खणून, विद्यमान विहिरींतून कमाल प्रमाणात तेल काढायला हवे. हे साध्य करण्याकरिता भागीदार करून किंवा व्यवसायाच्या इतर काही पद्धती स्वीकारून खासगी क्षेत्रातील कंपन्यांना या कामात सहभागी करून घायला हवे जेणेकरून तेल उत्पादन क्षेत्रात अधिक अनुभव असलेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रे आणि तंत्रज्ञान आपल्यापर्यंत येऊ शकेल. देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी ओएनजीसीला स्वतःची योजना तयार करून योग्य निर्णय घ्यायला हवेत.
तेल उत्पादनासाठी देशात अजूनही बराच भाग उपलब्ध असल्यामुळे अनेक मोठ्या आणि लहान कंपन्यांना समुद्रात आणि तटवर्ती भागात तेल संशोधनाचे काम करण्यासाठी पुरेसा वाव आहे.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774080)
Visitor Counter : 160