विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या 5 दिवसीय तंत्रज्ञान परिषद - 2021 चे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2021 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज इस्रोच्या 5 दिवसीय तंत्रज्ञान परिषद -2021 चे उद्घाटन केले आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इसरो द्वारे विकसित केल्या जाणाऱ्या भविष्यवादी आणि विघटनकारी तंत्रज्ञानाची माहिती दिली. इसरोच्या नेतृत्वाखाली तंत्रज्ञान विकास आणि अभिनवता संचालनालय (DTDI) द्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

काही भविष्यवादी तंत्रज्ञानासंदर्भात न डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, उपग्रह आधारित क्वांटम कम्युनिकेशनचा विकास देशाच्या संप्रेषण नेटवर्कला बिनशर्त डेटा सुरक्षा बाबतीत सक्षम करेल.
ते म्हणाले की प्रत्येक भविष्यवादी तंत्रज्ञानामध्ये स्पिन-ऑफ ऍप्लिकेशन्स क्षमता असतात आणि ते प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि केंद्रीत क्षेत्रांमध्ये लागू करायला हवेत.
त्यांनी इस्रोने सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नांमध्ये समन्वय आणण्याचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यवादी तंत्रज्ञानातून मिळालेल्या संधीचा लाभ घ्यायला सांगितले जे अंतराळ क्षेत्रासाठी आमूलाग्र बदल करणारे ठरणार आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1774078)
आगंतुक पटल : 256