अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते श्रीनगर येथे प्राप्तिकर विभागाच्या नवीन कार्यालयासह निवासी संकुल, 'द चिनार्स' चे उद्घाटन
Posted On:
22 NOV 2021 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथल्या प्राप्तिकर विभागाच्या नवीन कार्यालयासह निवासी संकुल, ‘द चिनार्स’ चे उद्घाटन आज केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते.
'द चिनार्स' आयकर भवन आणि संलग्न सुविधा सुरू करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांचे आभार सीतारामन यांनी यावेळी मानले. जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना हा प्रकल्प समर्पित करताना त्या म्हणाल्या की, श्रीनगर येथील हे प्राप्तिकर कार्यालय या भागातील नागरिकांना सर्वोत्तम करदात्या सेवांशी जोडण्यासाठी सेतू म्हणून काम करेल आणि त्यांना आयकर सेवा केंद्रामार्फत करप्रणालीबाबतच्या त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करेल. क्षेत्राच्या विकासात लोकसहभागासाठी एक सक्षम वातावरण हे केंद्र पुरवेल, असेही त्या म्हणाल्या.
सीबीडीटी आणि सीबीआयसीच्या अधिकाऱ्यांना बदलाचे दूत होण्याचे आवाहन सीतारामन यांनी प्रशासकांशी संवाद साधताना केले. उद्योगक्षेत्र आणि व्यावसायिक यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहनही त्यांनी अधिकाऱ्यांना केले. क्षेत्रातील करदात्यांना उत्तम सुविधा पुरवण्यात दोन्ही कार्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने सीबीडीटी आणि सीबीआयसीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करावे, यावर सीतारामन यांनी भर दिला.
करदात्यांना दर्जेदार सेवा देण्याच्या आणि जम्मू आणि काश्मीरमधील सर्व प्रकारच्या करदात्यांना देशाच्या कर प्रणालीमध्ये विश्वास आणि आदराच्या भावनेने सहभागी करून घेण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल होते.
G.Chippalkatti/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774043)
Visitor Counter : 188