माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

भारतीय पॅनोरमा (चित्रपट) विभागाच्या परीक्षक मंडळ सदस्यांचा माध्यमांशी संवाद

पणजी, 21 नोव्‍हेंबर 2021 

 

भारतीय  पॅनोरमा (चित्रपट) विभागाच्या परीक्षक मंडळ सदस्यांनी आज गोव्यात 52 व्या इफ्फीदरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी  संवाद साधला.

सदस्य मंडळाचे प्रमुख  (भारतीय पॅनोरमा – चित्रपट) आणि सन्माननीय चित्रपट निर्माते  एस.व्ही. राजेंद्रसिंग बाबू यांनी परीक्षक मंडळाने  केलेल्या निवड प्रक्रियेबद्दल सांगितले. या निमित्ताने वैविध्यपूर्ण संस्कृती आणि वैशिष्ठयपूर्ण आशयाची मोठी मेजवानी विविध चित्रपटांच्या रूपाने मिळाल्याचे त्यांनी सांगितले.   परीक्षक मंडळातील सदस्यांमध्ये   सिनेमॅटोग्राफर, चित्रपट समीक्षक, ऑडिओग्राफर इत्यादींसह चित्रपट उद्योगातील विविध क्षेत्रातल्या व्यक्ती असल्याने प्रत्येक सदस्याकडे वैशिष्ठयपूर्ण गुणवत्ता असल्याचे बाबू यांनी नमूद केले. 

"आम्ही फक्त 25 दिवसांत 221 चित्रपट पाहिले.  प्रत्येकाचे ए , बी , सी  असे वर्गीकरण केले आणि शेवटी भारतीय पॅनोरमा अंतर्गत चित्रपटांसाठी  अंतिम यादी केली." योग्य चित्रपट निवडणे किती कठीण होते हे देखील त्यांनी सांगितले.  कारण एक चित्रपट निवडणे म्हणजे दुसरा चित्रपट बाद करण्यासारखे होते.   230 मधून  24 चित्रपट  निवडणे खूप कठीण होते,” असे बाबू यांनी सांगितले.

इफ्फीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या  चित्रपटांबद्दल  ते म्हणाले. "आपल्याकडे  30 पेक्षा अधिक  राज्ये आहेत आणि ही यादी 21 पर्यंत मर्यादित ठेवणे  खूप कठीण आहे. आम्ही मंत्रालय आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाला  ती 30 ते 34 पर्यंत करण्याची  विनंती केली आहे."

प्रादेशिक भाषांमध्‍ये उदयाला येणाऱ्या आशयसंपन्नतेवर त्यांनी प्रकाश टाकला आणि ओटीटीवर प्रादेशिक चित्रपट  प्रदर्शित करणे किती कठीण आहे, हे त्यांनी सांगितले. ओटीटीवर  10 चित्रपट येत असतील तर 2 चित्रपट प्रादेशिक  असावेत, असे धोरण सरकारने आखावे, असेही बाबू यांनी सुचवले.

भारतीय  पॅनोरमा 2021 अंतर्गत  उदघाटन सत्राचा चित्रपट  म्हणून परीक्षक मंडळाने निवडलेला   एमी बरुआ यांचा  'सेमखोर' हा दिमासा भाषेतील (आसाममधील बोली) पहिला चित्रपट आहे. “आम्ही एकमताने हा चित्रपट निवडला.  अत्यंत छान प्रकारे केलेला हा  चित्रपट आहे,”असे  कौतुक बाबू यांनी  केले.

सिनेमॅटोग्राफर आणि परीक्षक मंडळ  सदस्यांपैकी एक, ज्ञान सहाय यांनीही या  चित्रपटाचे कौतुक केले  आणि इफ्फी प्रादेशिक भाषांमध्ये निर्मित  अशा चित्रपटांना योग्य व्यासपीठ कसे देते याबद्दल सांगितले. "सेमखोर' या  चित्रपटातील कलाकार किंवा त्याची भाषा 'दिमासा' किती जणांना माहित आहे? असा प्रश्न उपस्थित करून  नामांकित कलाकार  नसतानाही प्रादेशिक चित्रपटांना पडदा मिळवताना येणाऱ्या आव्हानांवर त्यांनी  प्रकाश टाकला.

असे प्रादेशिक चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित करून माहिती आणि प्रसारण मंत्रालय व दूरदर्शन अशा चित्रपटांना प्रोत्साहन देऊ शकतात असे सहाय यांनी सुचवले.

बारा सदस्यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाचे प्रमुख सन्माननीय  चित्रपट निर्माते आणि अभिनेते एस व्ही राजेंद्र सिंग बाबू असून परीक्षक मंडळातील सदस्य चित्रपट क्षेत्रातील विविध कामांचे, संस्था आणि पेशेवरांचे प्रतिनिधित्व करतात तसेच सामूहिकरीत्या वैविध्यपूर्ण भारतीय चित्रपट निर्मिती समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. हे सदस्य पुढीलप्रमाणे :

  1. राजेंद्र हेगडे, ऑडिओग्राफर
  2. माखोनमणी मोंगसाबा, चित्रपट निर्माते
  3. विनोद अनुपमा, चित्रपट समीक्षक
  4. जयश्री भट्टाचार्य, चित्रपट निर्मात्या
  5. ज्ञान सहाय, सिनेमॅटोग्राफर
  6. प्रसंतनु मोहोपात्रा, सिनेमॅटोग्राफर
  7. हेमेंद्र भाटिया, अभिनेता/लेखक/चित्रपट निर्माता
  8. असीम बोस, सिनेमॅटोग्राफर
  9. प्रमोद पवार, अभिनेते आणि चित्रपट निर्माते
  10. मंजुनाथ टी एस, सिनेमॅटोग्राफर
  11. मलय रे, चित्रपट निर्माते
  12. पराग छापेकर, चित्रपट निर्माते/पत्रकार

इफ्फीसाठी  एकूण 24 चित्रपटांची  निवड करण्यात आली आहे. 221 समकालीन भारतीय चित्रपटांमधून  निवडलेले हे चित्रपट भारतीय चित्रपट उद्योगाचे  चैतन्य आणि वैविध्यता यांचे प्रतिबिंब आहेत.


* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1773914) Visitor Counter : 218


Read this release in: English , Urdu , Hindi