माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav
iffi banner

इफ्फीमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन होणे हा मोठा बहुमानः अभिनेता कार्तिक आर्यन


धमाका म्हणजे उत्सुकता ताणून धरणारा ड्रामा आहे आणि तुम्ही पुरेपूर आनंद घ्याल

पणजी, 21 नोव्‍हेंबर 2021 

 

“माझा स्वतःचा चित्रपट या ठिकाणी दाखवला जात असताना इफ्फीमध्ये उपस्थित राहण्याचा वेगळाच आनंद आहे. यापूर्वी येथे मी केवळ एक चाहता म्हणून उपस्थित असायचो,” अभिनेता कार्तिक आर्यनने 52व्या इफ्फी महोत्सवाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. या चित्रपट महोत्सवामध्ये केलेल्या एकंदर व्यवस्थांबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. या महोत्सवाच्या ओटीटी सेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा धमाका हा चित्रपट दाखवला जात आहे. “ हा चित्रपट म्हणजे सतत तुमची उत्सुकता ताणून धरणारा ड्रामा आहे आणि नक्कीच त्याचा पुरेपूर आनंद घ्याल,” असे या होतकरू अभिनेत्याने गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज भेट दिल्यानंतर सांगितले.

सध्याच्या काळात लोकांना जो पर्याय उपलब्ध असेल त्यावर चित्रपट पाहण्यास ते पसंती देत असल्याने, चित्रपटांचे प्रदर्शन चित्रपटगृहांमध्ये पडद्यावर करण्याबरोबरच ओटीटीवर करण्याचे आपण समर्थन करत आहोत, असे तो म्हणाला. धमाका हा एक तास 44 मिनिटांचा थ्रिलर असून त्याचे चित्रिकरण एका खोलीमध्ये 360 अंशांचे तंत्रज्ञान वापरून करण्यात आले आहे. राम माधवानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

“त्या खोलीमध्ये जेव्हा मी या सिनेमासाठी काम करत होतो तेव्हा आठ ते दहा कॅमरे माझ्यावर रोखलेले होते,” असे आर्यनने सांगितले. धमाका नेटफ्लिक्सवर दाखवला जात आहे आणि इफ्फीमध्ये तो ब्रिक्स चित्रपटांचा एक भाग म्हणून दाखवला जाईल. पहिल्यांदाच भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांचे चित्रपट इफ्फी महोत्सवासोबत आयोजित केलेल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत.


* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1773838)
Read this release in: English , Urdu , Hindi