माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अभिनेता होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांनी स्वत:ला ऑलिम्पिक क्रीडापटूप्रमाणे घडवले पाहिजे: हृतिक रोशन
पणजी, 21 नोव्हेंबर 2021
“प्रत्येक पात्रात एक प्रकारचा वेडेपणा असतो. खरी जादू तेव्हा घडते जेव्हा एखाद्या अभिनेत्याला हा वेडेपणा समजतो”,असे मार्गदर्शन सुपरस्टार हृतिक रोशन यांनी आज 52 व्या इफ्फीच्या आभासी संभाषण सत्रात केले.
अभिनेत्याने सर्वप्रथम व्यक्तिरेखा स्वतःमध्ये भिनवणे आणि त्या व्यक्तिरेखेशी पूर्णपणे एकरूप होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
उदयोन्मुख अभिनेत्यांना सल्ला देताना हृतिक म्हणाले, “त्यांनी स्वत:ला ऑलिम्पिक खेळाडूंसारखे घडवले पाहिजे. त्यांनी दररोज प्रशिक्षण आणि सरावासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत आणि सतत चित्रपटप्रेमींमध्ये वावरले पाहिजे.
आपल्या सामाजिक वातावरणातील सर्व प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व चित्रपटांमध्ये योग्य रीतीने उमटण्याची गरज त्यांनी ओटीटी मंचाच्या महत्त्वाविषयी बोलताना व्यक्त केली. ओटीटी मंचाच्या उदयामुळे, सर्व कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
या सत्राला लेखक आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदही उपस्थित होते. चित्रपट दिग्दर्शित करणे ही एक दीर्घ आणि सर्वकष प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले. “दिग्दर्शकासाठी प्रथम कथेचे सृजन महत्त्वाचे आहे. मग संहितालेखन, संवाद, कलाकारांची निवड, पटकथा अशा प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.
या सत्राचे सूत्रसंचालन कोमल नाहटा यांनी केले.
* * *
Jaydevi PS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773823)
Visitor Counter : 253