आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 116.50 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसींच्या 67.25 लाख मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.30%

गेल्या 24 तासात 10,488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,22,714

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.94 %) गेले 58 दिवस 2% पेक्षा कमी

Posted On: 21 NOV 2021 11:14AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021

गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 67,25,970 मात्रा देण्यात आल्या असून भारताने एकूण 116.50 कोटी (1,16,50,55,210) मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 1,20,41,157 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,82,198

2nd Dose

94,00,674

 

FLWs

1st Dose

1,83,75,974

2nd Dose

1,63,06,666

 

Age Group 18-44 years

1st Dose

44,20,03,682

2nd Dose

19,01,32,509

 

Age Group 45-59 years

1st Dose

18,05,79,345

2nd Dose

11,07,04,731

 

Over 60 years

1st Dose

11,31,14,229

2nd Dose

7,40,55,202

Total

1,16,50,55,21

गेल्या 24 तासात 12,329 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,39,22,037 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.30% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 147 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 10,488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,22,714  आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.36% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,74,099 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 63.16 (63,16,49,378) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.94% असून गेल्या 58  दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.96% असून गेले 48 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 83 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773673) Visitor Counter : 154