आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 लसीकरण अद्ययावत माहिती


(CoWIN)को-विनवरील नवीन वैशिष्ट्यासह “तुमची लसीकरण स्थिती जाणून घ्या”

Posted On: 20 NOV 2021 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021

कोविन डिजिटल मंचावर  तुमची लसीकरण स्थिती जाणून घ्या हे नवीन वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हे को -विन /आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पडताळणी करणाऱ्या घटकाच्या अधिकृत अधिकारानुसार नागरिकांची लसीकरण स्थिती/तपशील सत्यापित/पुनर्प्राप्त करण्यात मदत करेल. सेवा प्रदात्याला  (ट्रॅव्हल एजन्सी , कार्यालये, नियोक्ते, मनोरंजन संस्था  इत्यादी खाजगी संस्था किंवा आयआरसीटीसी, सरकारी कार्यालये इ. सारख्या सरकारी संस्था) नागरिकाने विनंती केलेल्या सेवेची सुविधा देण्यासाठी ही सेवा वापरता येईल.

तुमची लसीकरण स्थिती जाणून घ्या वैशिष्ट्याचे फायदे:

विनंती केलेल्या सेवेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल किंवा कागदी स्वरूपात लस प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी ही सेवा तयार केली जात आहे.आणि विनंती करणार्‍या घटकाच्या अधिकृत परवानगीनुसार नागरिकाच्या लसीकरण स्थिती/लसीकरण डिजिटल नोंदीची  पडताळणी करण्यासाठी सेवा प्रदात्याला समर्थन देऊ शकते.

ही सेवा वापरण्याचे काही फायदे आहेत:   

  1. ही सेवा व्यक्तींच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करण्यात मदत करते. लसीकरण स्थिती म्हणजे पूर्णपणे लसीकरण, अंशतः लसीकरण किंवा लसीकरण केलेले नाही.
  2. ट्रॅव्हल एजन्सीद्वारे या सेवेचा उपयोग केला जाऊ शकतो आणि केवळ लसीकरण केलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी देऊन या व्यक्तींचा  प्रवास सुरक्षित करण्यात मदत होऊ शकते.
  3. कर्मचाऱ्यांच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करण्यासाठी आणि कार्यालये, कार्यस्थळी  इत्यादी ठिकाणी कार्ये पुन्हा सुरू करण्यासाठी नियोक्ते ही सेवा वापरू शकतात.
  4. ही सेवा देशातील आर्थिक व्यवहार  पुन्हा सुरू करण्यास आणि उत्प्रेरित करण्यास मदत करेल.

देण्यात आलेल्या सेवा:

लाभार्थीची संरक्षित आरोग्य माहिती  उघड न करता एखाद्या व्यक्तीच्या कोविड लसीकरण स्थितीची पडताळणी करणे

ही सेवा ओपन एपीआय किंवा नो-कोड वेबपृष्ठ एकत्रीकरणाद्वारे  सुरु  केली जाऊ शकते, जी को -विन ने खाजगी/सरकारी सेवा प्रदात्यांसाठी एखाद्या व्यक्तीची लसीकरण स्थिती प्रमाणीकरण एपीआय /नो-कोड वेबपेज एकत्रीकरणाद्बारे  खालील प्रतिसादांसह पुनर्प्राप्त करण्यासाठी तयार केली आहे -

  • लसीकरण झालेले नाही
  • अंशतः लसीकरण
  • पूर्ण लसीकरण

को -विन  वर "तुमची लसीकरण स्थिती जाणून घ्या" सेवेचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्ता दिलेल्या पायऱ्यांनुसार कृती करू शकतो :      

  1. वापरकर्त्याने को -विन  मुख्यपृष्ठावर "तुमची लसीकरण स्थिती सेवा जाणून घ्या" या टॅबवर क्लिक करावे :

        2. वापरकर्त्याला  खालीलप्रमाणे वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल:

     3.  पुढील पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत.

  1. सेवा प्रदाता लाभार्थीचे पूर्ण नाव आणि को -विनवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सादर करेल
  2. सेवा प्रदात्याचा अर्ज को -विनच्या लसीकरण प्रमाणीकरण एपीआय/नो कोड वेबपृष्ठ एकत्रीकरणास विनंती  करेल
  3. को -विन अधिकृतता तपशील/परवानगी आणि योग्य नाव आणि मोबाइल क्रमांक संयोजनानुसार विनंती पडताळणी /प्रमाणीकरण करेल
  4. लाभार्थीच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर  एक ओटीपी  पाठवला जाईल
  5. लाभार्थीकडून  युआय मधील डेटा एंट्री स्क्रीनद्वारे सेवा प्रदात्याला ओटीपी प्रदान करण्याची विनंती केली जाईल
  6. यशस्वी मोबाइल ओटीपी प्रमाणीकरणानंतर, को -विन लसीकरण कार्यक्रम तपशील आणि लोकसंख्येसह लसीकरण स्थिती सामायिक करेल.लसीकरण स्थिती विनंतीची नोंदणी केल्यावर, को -विन  विनंती सत्यापित करेल आणि एक वैध प्रतिसाद परत पाठवेल, एकतर लसीकरण केलेले नाही, अंशतः लसीकरण केलेले किंवा वर स्पष्ट  केल्याप्रमाणे पूर्णपणे लसीकरण केलेले आहे.

4.     व्यक्ती समाजमाध्यमांवर त्यांच्या लसीकरण स्थितीचे ग्राफिक्स देखील सामायिक करू शकते.

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773577) Visitor Counter : 305