PIB Backgrounder
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
18 NOV 2021 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 18 नोव्हेंबर 2021



आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73,44,739 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 114 कोटी 46 लाखांचा (1,14,46, 32,851) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,17,53,091 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
गेल्या 24 तासांत 11,242 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,38,85,132 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.28% इतका आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग 144 दिवस, 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.
गेल्या 24 तासांत, 11,919 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,28,762 इतकी आहे,देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.37% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,32,505 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 62 कोटी 82 लाखांहून अधिक (62,82,48,841) चाचण्या करण्यात आल्या.
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.94% असून गेले 55 दिवस हा दर 2%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.97% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 45 दिवस 2% हून कमी आणि गेले सलग 80 दिवस 3% हून कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स :-
S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773105)
अभ्यागत कक्ष : 178