संरक्षण मंत्रालय
पश्चिम नौदल कमांडतर्फे पश्चिमी किनारपट्टी विकास भागात ‘प्रस्थान’सराव
Posted On:
18 NOV 2021 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021
भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयाच्या अधिपत्याखाली, 16 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईच्या किनारा परिसरातील विकास भागात ‘प्रस्थान’ हे सांकेतिक नाव दिलेला किनारी सुरक्षाविषयक सराव पार पडला. दर सहा महिन्यांनी केला जाणारा हा सराव, किनारी भागातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा घटक आहे आणि किनारा परिसरातील विकास भागात येऊ शकणाऱ्या विविध प्रकारच्या अनपेक्षित घटनांबाबत प्रमाणित परिचालन पद्धती आणि प्रतिसादविषयक प्रणालीमध्ये सफाईदारपणा आणण्यासाठी भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, तटरक्षक दल, ओएनजीसी, बंदर व्यवस्थापन, सीमा शुल्क विभाग, राज्य मत्स्य व्यवसाय विभाग आणि सगळी पोलीस दलासह सर्व हितधारकांचे प्रयत्न एकत्र करण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात आला.
मुंबईच्या पश्चिमी किनाऱ्यापासून 94 नाविक मैलांवर असलेल्या ओएनजीसीच्या एमएचएन प्लॅटफॉर्म वर हा सराव करण्यात आला.
दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट, मोठी आग, तेलगळती, मानवी हल्ला, मृतदेह अथवा जखमींचे स्थलांतर, जहाजावरील नियंत्रण सुटणे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर यासारख्या आकस्मिक घटनांच्या प्रतिसादाबाबत यावेळी सराव करण्यात आला. वास्तववादी परिस्थितीचा अनुभव देऊन सर्व आकस्मिक घटनांना योग्य प्रतिसाद देऊन किनारा परिसरातील विकास भागात त्यांच्याशी लढा देण्याविषयीची त्यांची सज्जता तपासण्याची तसेच अशा वेळी समन्वय साधून एकत्रितपणे कार्य करण्याची संधी या सरावाने सर्व हितधारकांना दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773068)
Visitor Counter : 248